ब्रेकिंग - कोल्हापूरात समूह संसर्गातून बुधवार दुपारपर्यंत 41 रुग्ण वाढले... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जुलै 2020

कोल्हापूरात आलेल्या एका व्यक्तिला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.  

कोल्हापूर : जिल्ह्यात आज सकाळी कोरोनाचे 16 नवे रुग्ण आढळले आहे. तर दुपारपर्यंत हा आकडा तब्बल 41 वर जाऊन पोहोचला आहे .सकाळी आलेल्या अहवालामध्ये हातकणंगले, करवीर, पन्हाळा तालुक्‍यासह कोल्हापूर शहरातील रुग्णांचा समोवश आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग वाढत आहे. प्रतिदिन 40 ते 60 नवे रुग्ण आढळून येत आहे. आज सकाळीच 17 नवे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये, हातकणंगले तालुक्‍यातील इचलकरंजी येथील 6, हातकणंगले 1, रेंदाळ येथील 1 असे एकूण 8 रुग्ण आढळले आहेत. तर, करवीर तालुक्‍यातील गांधीनगर येथे 5, पन्हाळा तालुक्‍यातील पोखले 1, कोल्हापूर शहरात 2 व पुण्यातून कोल्हापूरात आलेल्या एका व्यक्तिला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा- पंचगंगा स्मशानभूमीत 16 कोविड योद्धे 24 तास कार्यरत
वाचा सविस्तर...

दुपारी दीड वाजता आलेल्या अहवालात पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यात पंचवीस नवीन रुग्ण आहेत. यामध्ये करवीर तालुक्यातील 17, कोल्हापूर शहरातील 7 तर पन्हाळ्यातील 1 रुग्णांचा समावेश आहे. यामुळे बुधवारी सकाळपासून दुपारपर्यंत एकूण तब्बल 41 रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत 

 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more 27 corona patient found in kolhapur district