ब्रेकिंग- कोल्हापुरात आणखी नऊ जण पाॅझिटिव्ह ; एका डाॅक्टरलाही कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

या नऊ जणांसह जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता ४३६ वर पोहोचली आहे.

कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या आता साडेचारशेजवळ पोहोचली आहे. नुकत्याच हाती आलेल्या अहवालानुसार आणखी नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणचे या नऊ जणांमध्ये एका महिला डाॅक्टरांचाही कोरोना अहावाल पाॅझिटिव्ह आला आहे. या नऊ जणांसह जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता ४३६ वर पोहोचली आहे. 

आता पाॅझिटिव्ह अहवाल आलेल्यांपैकी चंदगड येथील एक, शहरातील एक, शाहूवाडी तीन आणि राधानगरी चार जणांचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, गेल्या चाैदा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संखेत रोज वाढ होत आहे.  मुंबई, पुणे, सोलापूर भागातून जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी आलेल्या व्यक्तींची तपासणी गेल्या काही दिवसांत सुरू आहे. कोरोनासदृश लक्षणे दिसणाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्याचे अहवाल प्राप्त होत असून काल दिवसभरात १९ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्या सर्वांनी प्रवास केल्याचे स्पष्ट झाले आहे. यात शाहूवाडीतील सर्वाधिक १४ जण आहेत. अन्य तीन तालुक्‍यातील प्रत्येकी एक ते दोन आहेत. अजूनही दीड हजारांवर स्वॅबचे परीक्षण येत्या दोन दिवसांत होणार आहे. त्यातही बाहेरून आलेल्या व्यक्तीच अधिक आहेत. 

हे पण वाचा - एका फोनवरील मन हेलावणारी करूण कहाणी 

दिवसभरात एकूण २० व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. यापूर्वी १९ व्यक्ती कोरोनामुक्त होत्या. या सर्वांना आज १०८ रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आले. सीपीआर रुग्णालयात तालुक्‍यातील शासकीय रुग्णालयांच्या डॉक्‍टरांनी परिश्रमपूर्वक या सर्वांवर उपचार केले. येत्या चार दिवसात आणखी काही व्यक्ती कोरोनामुक्त होण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार पहिला स्वॅब निगेटिव्ह आलेल्या आणखी १६ रुग्णांचे दुसरे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more nine corona positive patient fund in kolhapur