काळाचा घाला : सौंदलग्याजवळील अपघातत सांगलीच्या मायलेकी ठार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 February 2021

पाटील कुटुंबीय सांगलीहून कारने बंगळूरला निघाले हाेते. बेळगावच्या दिशेने जाताना राष्ट्रीय महामार्गावरील सौंदलगा येथील कळंत्रे मळ्यानजीक आल्यावर कारची महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या झाडाला धडक बसली.

सौंदलगा (बेळगाव) : पाटील कुटुंबीय सांगलीहून कारने बंगळूरला निघाले हाेते. बेळगावच्या दिशेने जाताना राष्ट्रीय महामार्गावरील सौंदलगा येथील कळंत्रे मळ्यानजीक आल्यावर कारची महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या झाडाला धडक बसली.
या अपघातात लता व अनिषा या मायलेकी ठार तर कारमधील अन्य तिघे जण जखमी झाले.

हा अपघात  राष्ट्रीय महामार्गावरील कळंत्रे मळ्यानजीक रविवारी (ता. ७) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास  झाला. कारने झाडाला जोराने धडक दिली. लता राजेंद्र पाटील (वय ४०) व अनिषा राजेंद्र पाटील (वय १७) अशी मृतांची तर अथर्व राजेंद्र पाटील (१४), सुमीत राजेंद्र पाटील (१९), राजेंद्र शिवाजी पाटील (४४, सर्व रा. बिस्तूर. जि. सांगली) अशी जखमींची नावे आहेत. 
निपाणी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. 

याबाबत अधिक माहिती अशी,

पाटी कुटुंबीय सांगलीहून कारने बंगळूरला निघाले हाेते. बेळगावच्या दिशेने जाताना राष्ट्रीय महामार्गावरील सौंदलगा येथील कळंत्रे मळ्यानजीक आल्यावर कारची महामार्गाच्या बाजूला असणाऱ्याझाडाला धडक बसली.या अपघातात लता व अनिषा या मायलेकी ठार तर कारमधील अन्य तिघे जण जखमी झाले.

हेही वाचा- अहमदाबाद विमानसेवेला मिळाला  ग्रीन सिग्नल ;  महिनाअखेरीस तिरुपती सेवाही सुरळीत

घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार यांच्यासह महामार्ग देखभाल करणाऱ्या जयहिंद कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यांनी कारमध्ये अडकून पडलेल्या तिघा जणांना बाहेर काढून निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेत कारचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. उशीरा पाटील कुटुंबीयांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी  पाेलिस अधिक माहिती घेत हाेते. जखमींना पुढील उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयातून अन्यत्र हलविण्याच्या हालचाली सुरू होत्या.

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother and daughter an accident near Saundalga Three injured belgove marathi news