मोटीरीत सीट बेल्ट सक्तीचा... 

Motorized seat belt forced ...
Motorized seat belt forced ...

कोल्हापूर : मोटारीतून प्रवास करताय, तर चालकांबरोबर शेजारी बसलेल्याही सीट बेल्ट लावावाच लागेल. वाहतुकीला शिस्तीबरोबर अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी शहर वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. पहिल्याच दिवशी सीट बेल्ट न लावलेल्या 55 वाहन चालकांवर दंडाची कारवाई केली. 

शहर परिसरातील वाहतुकीची होणारी कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. वाहतुकीच्या नियोजनासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून चार ते पाच महिन्यापासून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. वारंवार प्रबोधनाचीही मोहीम राबवली जात आहे. मोटार व्हेईकल ऍक्‍ट कलम 138-177 अन्वये मोटारीतून प्रवास करणाऱ्यांना सीट बेल्ट सक्तीचा आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारण्याची तरतुद आहे. महामार्गावर सीट बेल्ट लावण्याचा कल आहे. पण आज शहरात तो दिसून येत नाही. वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबर अपघाताचे प्रमाणही वाढू लागले आहे.

शहरात मोटारीतून प्रवास करणाऱ्यांना सीट बेल्टची सक्तीची काटेकोर अमंलबाजणीस काल पासून शहर वाहतूक शाखेच्या पुढाकारातून करण्यात आली. पहिल्या टप्प्यात मोटार चालक व त्याच्या शेजारी बसणाऱ्या व्यक्तीस हा सीट बेल्ट सक्तीचा करण्यात आला आहे. पुढील टप्प्यात पाठीमागील आसनावर बसणाऱ्यांनी सीट बेल्ट सक्तीची अमंलबजावणी होणार आहे. तशी सीट बेल्टची सुविधा नसेल तर ती वाहनात करून घ्यावी असे आवाहन केले आहे. सीट बेल्टच्या कायद्याच्या अमंलबाजणीस शहर वाहतूक शाखेने सुरवात केली. पहिल्याच दिवशी सीट बेल्ट न लावलेल्या 55 वाहन चालकांकडून प्रत्येकी 200 रूपये प्रमाणे दंडाची वसुली केली. ही मोहीम शहरात येथूनपुढे व्यापक करण्यात येणार आहे. 

कारवाईच्या भितीपोटी नव्हे तर सुरक्षीततेच्या दृष्टीने मोटारीतील चालकासह त्यात बसणाऱ्यांनी सीट बेल्ट लावणे महत्वाचे आहे. सीट बेल्ट न लावणाऱ्यांवर कारवाईची मोहीम येथून पुढे सुरूच राहील. 
-वंसत बाबर, शहर वाहतूक शाखा, पोलिस निरीक्षक. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com