'कोल्हापूर की खड्डेपूर' ; रिक्षाचालकांचे आक्रोश आंदोलन

movement against kolhapur municipal corporation by auto driver on the topic of poor road conditions in kolhapur
movement against kolhapur municipal corporation by auto driver on the topic of poor road conditions in kolhapur

कोल्हापूर : 'कोल्हापूर की खड्डेपूर' अशी जोरदार घोषणा देत रस्ते प्रश्‍नावरून शहरातील रिक्षाचालकांनी आज थेट महापालिकेसमोर रिक्षा पार्किंग करून आंदोलन केले. महापालिका पदाधिकाऱ्यांनी या प्रश्‍नी तातडीने समिती नियुक्ती करून रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले. शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे ती 'सकाळ' ने गेल्या पंधरा दिवसापासून वृत्तमालिकेच्या माध्यमातून पुढे आणली. जिल्हा वाहनधारक महासंघ या प्रश्‍नावरून सातत्याने आंदोलन करत आहे. 

महापालिकेने गेल्या नोव्हेंबरमध्ये रस्ते टकाटक करण्याचे आश्‍वासन दिले होते. उन्हाळ्यात कोरोनाचे संकट उभे राहिले. शहर लॉकडाऊन झाले पण खड्डयांची डागडुजी झाली नाही. पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था बिकट झाली. ज्या रस्त्यावर थोडेफार खड्डे होते तो अखंड रस्ता आता खराब झाला आहे. प्रमूख रस्ते चकचकीत दिसत असले तरी अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. 'सकाळ' ने भागनिहाय रस्त्यांची दुरावस्था मांडली. लोकांनीही उस्फुर्तपणे प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 

अखेर आजच्या महासभेच्या दिवशीच रिक्षाचालकांनी लक्ष वेधले. सकाळी अकरा वाजता डोक्‍यावर पिवळ्या रंगाच्या टोप्या त्यावर 'कोल्हापूर की खड्डेपूर' अशा आशयाचा मजकूर लक्षवेधी ठरत होते. एकेक रिक्षा महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर पार्किंग होत गेली आणि जोपर्यंत ठोस आश्‍वासन देत नाही तोपर्यंत रिक्षा न हटविण्याचा निर्धार रिक्षाचालकांनी केला. पालिकेसमोरील रस्त्यावर रिक्षांचे पार्किंग झाले. जोरदार घोषणाबाजीस सुरवात झाली. 

खराब रस्ते नव्याने करावेत, रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत खड्डयांचे पॅचवर्क दर्जेदार करावे, जानेवारी 2020 पासून जे रस्ते खराब झाले आहेत, त्यांची महापौर तसेच आयुक्तांनी पाहणी करून ठेकेदाराकडून नियमाप्रमाणे रस्ते करून घ्यावेत, व संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, रस्त्यांच्या निविदा तातडीने प्रसिद्ध कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या. 

अखेर महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, महिला, बालकल्याण सभापती शोभा कवाळे, गटनेता शारंगधर देशमुख, मधुकर रामाणे, सचिन चव्हाण आदि आंदोलकांसमोर आले. त्यांनी ज्या रस्त्यांची कामे होणार आहेत त्याची यादी आंदोलकांना दाखवली. या प्रश्‍नी तातडीने समिती नियुक्ती त्यांच्या देखरेखीखाली कामे सुरू करण्याचे आश्‍वासन दिले. वाहनधारक महासंघाचे अध्यक्ष अभिषेक देवणे, कार्याध्यक्ष चंद्रकांत भोसले. राजेंद्र जाधव, विजय गायकवाड, इंद्रजित आडगुळे, निलेश हंकारे, दिलीप सुर्यवंशी, आनंदा चिले, अतुल माळकर, जुनेद शेख, बादशहा फरास, विट्ठल जानकर,नामदेव पाडळकर, निवास बोडके, मागेश बुचडे, उदय गायकवाड,संतोष भंडारे आदी आंदोलनात सहभागी झाले. 

आंदोलनाला 'सकाळ' चे बळ 

शहरातील रस्त्यांची नेमकी स्थिती कशी आहे याचे छायाचित्रासब बातमीच्या माध्यमातून 'सकाळ' ने लक्ष वेधले. कंबरेच्या हाडांचा खुळखुळा कसा होतो. वाहनांच्या सुट्या भागांना कसा दणका बसतो याची माहिती दिली. नागरिकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. शहरवासियांच्या वेदनेला वाट करून देण्याचे काम 'सकाळ' ने केले. त्यास वाहनधारक महासंघाने साथ दिली. 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com