आंबेओहळ धरणग्रस्तांचे आत्मक्‍लेश आंदोलन

Movement Of Ambeohal Dam Victims Kolhapur Marathi News
Movement Of Ambeohal Dam Victims Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : आंबेओहळ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत धरणग्रस्तांनी आज आत्मक्‍लेश करून घेतला. आंबेओहळ धरणग्रस्त संग्राम संघटनेच्या नेतृत्वाखाली येथील प्रांत कार्यालयासमोर हे आंदोलन झाले. दरम्यान, माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्यासह समाजातील विविध घटकांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. 

आंबेओहळ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. त्यासाठी धरणग्रस्तांकडून पाठपुरावा सुरू आहे. या कामाकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्यासाठी धरणग्रस्तांनी आज आत्मक्‍लेश आंदोलन केले. दिवसभर प्रांत कार्यालयासमोर ठिय्या मारला. स्वत:च्या गालावर थप्पड मारून घेत आत्मक्‍लेश करुन घेतला.

धरणग्रस्तांना लाभ क्षेत्रातील दिलेल्या जमिनीला भोगवटदार वर्ग 1 त्वरित करावे, चुकीची नोंद घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना लिंगनूर येथील नियोजित भूखंडाचे वाटप करावे, धरणग्रस्तांवर पॅकेजची सक्ती करू नये, संकलन दुरुस्ती तत्काळ करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन झाले. 

आंबेओहळ धरणग्रस्त संग्राम संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव, श्रीराम चौगुले, शंकर पावले, सदाशिव शिवणे, नामदेव पोटे, महादेव पुंडपळ, आनंदा बाबर, शिवाजी बाबर, विनायक पुंडपळ, नाना पुंडपळ, सखाराम कदम, शामराव पुंडपळ, महादेव खाडे, पांडुरंग शिवणे, रावसाहेब पवार, सचिन पावले, आनंदा पावले आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्यासह गडहिंग्लज व आजरा तालुक्‍यातील विविध नागरीकांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दिला. 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com