आजरा कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको

Movement To Start Ajara Sugar Factory Kolhapur Marathi News
Movement To Start Ajara Sugar Factory Kolhapur Marathi News

आजरा : आजरा कारखान्याचा येणारा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या थकहमीचा अडसर आहे. ग्रामविकास मंत्री व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी नाहरकत देवून कारखाना सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी केले. आजरा कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने येथील संभाजी चौकात रास्ता रोको केला. जिल्हा प्रमुख देवणे व उपजिल्हा संघटक संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन झाले. या वेळी देवणे बोलत. रास्ता रोकोमुळे सावंतवाडी-कोल्हापूर मार्गावरील सुमारे दोन तास वाहतुक ठप्प झाली. 

देवणे म्हणाले, ""आजरा कारखाना थकीत कर्जापोटी जिल्हा बॅंकेने ताब्यात घेतला आहे. या कारखान्याचा गतवर्षीचा गळीत हंगाम बंद राहिला. यंदा देखील गळीत हंगाम सुरू राहिल की, नाही याबाबतचे चित्र निश्‍चित नाही. महाविकास आघाडीने अनेक कारखान्यांना थकहमी दिली आहे. आजरा कारखान्यालाही थकहमी देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे, पण यासाठी कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या नाहरकतची गरज आहे.

जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी नाहरकत द्यावी. कोरोना, अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. मंत्री मुश्रीफही या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांनी या लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी पुढाकार घ्यावा.'' या वेळी शिवसेना तालुका प्रमुख युवराज पोवार, शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, दयानंद भोपळे, संकेत सावंत, दिनेश कांबळे, संजय येसादे उपस्थित होते. याबाबतचे निवेदन जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मुश्रीफ यांना देण्यात आले. 

पण आजऱ्याची चिमणी पेटवा! 
शिवसेनेने ऊस, दुध दरवाढीबरोबर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांसाठी आंदोलन केली आहेत. या तालुक्‍यातील आजरा कारखाना थकीत कर्जापोटी बंद आहे. यामुळे शेतकरी, सभासद व कर्जदारांचे हाल होत आहेत. राज्यात महाआघाडीचे सरकार असून याबाबत बाजू मांडून कारखान्याची चिमणी पेटवावी, अशी मागणी हाजगोळी बुद्रकच्या सरपंच उज्वला संजय येसादे यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे यांना दिलेल्या निवेदनातून केली. 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com