इचलकरंजीत वीज कर्मचाऱ्यांची शर्थ 

इचलकरंजीत वीज कर्मचाऱ्यांची शर्थ 

इचलकरंजी : रविवारी रात्री 9 मिनिटांसाठी सतर्क झालेल्या महावितरण कर्मचाऱ्यांची काल झालेल्या वादळी पावसाने तारांबळ उडवली. रात्री वीज विस्कळित न होण्यासाठी डोळ्यात तेल घालून काम करणाऱ्या 264 कर्मचाऱ्यांनी नेटके नियोजन केले. पाऊस आणि वादळाने शहर व परिसरात काही ठिकाणी खांब पडून व तारा तुटून खंडीत वीज पुरवठा आठ तासांत शर्थीने सुरळीत केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विरूध्द लढण्यासाठी देशवासियांना रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील दिवे बंद करून दिप प्रज्वलीत करण्याचे आवाहन केले होते. या पार्श्‍वभूमीवर या 9 मिनिटांसाठी वीजेच्या मागणीत घट होऊन वीजेचे पॉवरग्रीड फेल होऊ नये यासाठी महावितरणने नेटके नियोजन केले होते. जनता कर्फ्यूपासून वीज पुरवठ्यात अडथळा येऊ नये, यासाठी इचलकरंजी महावितरण कार्यालयाचे 264 कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. रविवारी योग्य नियंत्रण ठेवलेहोते. परिमंडळाअंतर्गत 16 उपकेंद्रावर 16 सहाय्यक अभियंत्यांचे परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे काम सुरू होते. काल रात्री 8 पासून प्रत्येक 5 मिनिटाला व्होल्टेज, विद्युत प्रवाह, वितरण यांचे निरिक्षण करून अहवाल पाठविला जात होता. हे काम रात्री साडेनऊपर्यंत चालले. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते शेवटच्या उपकेंद्रातील कर्मचाऱ्यापर्यंत प्रत्येकजण यासाठी कार्यरत होता. या कालावधीत पुरवठ्यात अडथळा न येता 110 विद्युत वाहिनीवरील वीज पुरवठा सुरळीत राहिला. हे काम सुरळीत झाल्यानंतर दुपारच्या पावसात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. चंदूर परिसरात खांब पडले होते. तर काही ठिकाणी तारा तुटल्या होत्या. हे काम सोमवारी सायंकाळपर्यंत पूर्वस्थितीत आणून कर्मचाऱ्यांनी ताबडतोब वीज पुरवठा सुरू केला. 


रविवारी रात्री दिवे बंद ठेवण्याच्या उपक्रमात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक काम केले. वीज उपकेंद्रात वीज भाराचे नियंत्रण ठेवले. त्यात दुपारच्या वादळी पावसामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला होता. पण रात्री उशिरापर्यंत सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्याने वीज पुरवठ्यात व्यत्यय आला नाही. 
- सोमाण्णा कोळी, कार्यकारी अभियंता, इचलकरंजी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com