ह्रदयद्रावक! अन् "त्या' कंत्राटी कर्मचाऱ्याच्या आयुष्याची "तार' तुटली 

MSEDCL employee dies in kolhapur
MSEDCL employee dies in kolhapur

बाजार भोगाव (कोल्हापूर) - 27 जूनला ट्रॉन्सफॉर्मरचे काम करताना विद्युत प्रवाह अचानकपणे चालू झाल्याने विजेचा धक्‍क्‍याने भाजून तसेच खांबावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या "महावितरण'च्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या आयुष्याची "तार' आज उपचारादरम्यान तुटली. किरण भाऊ चव्हाण (वय 37, रा. चव्हाणवाडी, ता. पन्हाळा) असे त्यांचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, किरण चव्हाण "महावितरण'च्या कळे येथील वीज कार्यालयांतर्गत विद्युत वाहिनी सहाय्यक होते. त्यांच्याकडे वाळोली गावचा चार्ज होता. 26 जूनला म्हामुलकर डीपीवर तांत्रिक बिघाड झाला होता. दुरुस्तीसाठी ग्रामस्थ सातत्याने भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत होते. वीजपुरवठा बंद असल्याने भातरोप लावण खोळंबली होती. भात लावणीच्या कामात येणारा व्यत्यय टाळण्यासाठी ते 27 जूनला सकाळी वाळोलीत आले. "महावितरतरण'शी संबंधित कळे कार्यालयातून रितसर परवानगी घेऊन त्यांनी म्हामूलकर डीपीकडील विद्युत प्रवाह बंद केला व बिघाड नेमका काय आहे, हे पाहण्यासाठी खांबावर चढून काम करू लागले; पण काम करत असतानाच सकाळी साडेआठच्या सुमारास अचानक प्रवाह सुरू झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यात त्यांच्या उजव्या हातासह, छाती व डाव्या पायाला भाजून जखम झाली. याच अवस्थेत ते खांबावरून कोसळले. गंभीर जखमी स्थितीत नऊ दिवसांपासून त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तथापी, काल रात्रीपासूनच त्यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळेनासा झाल. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. 

पत्नीला सेवेत घ्या 
विद्युत वाहिनी सहाय्यक असलेल्या किरण चव्हाण यांचा कामावर असताना अपघाती मृत्यू झाल्याने "महावितरण'ने त्यांचे वैयक्तिक लाभ तातडीने चव्हाण कुटुंबीयांना द्यावेत, शिवाय पत्नीला "महावितरण'च्या सेवेत अनुकंपा तत्त्वावर प्रथम प्राधान्याने सामावून घ्यावे, अशी मागणी चव्हाणवाडीसह वाळोलीच्या ग्रामस्थांतून होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com