मनपाने क्रिडा विभाग पुन्हा सुरु करावा 

Municipal Corporation should resume sports
Municipal Corporation should resume sports

कोल्हापूर : अनेक खेळांचे माहेरघर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. आवर्जून उल्लेख करावा असे खेळ म्हणजे कुस्ती आणि फुटबॉल, या दोन्ही खेळाला येथे राजाश्रय मिळाला, असे असूनही या खेळांबाबत आणि इतर खेळांबाबत महानगपालिकेची उदासिनता दिसून येते. महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाचे अस्तित्व शोधावे लागते. हा विभाग पून्हा सुरु होण्यासाठी संघटनांना आंदोलने करावी लागतात ही खंत आहे. कोल्हापूरच्या क्रिडा विश्‍वाला बळ देण्यासाठी महापालिकेच्या बजेटमध्ये खास तरतूदच करावी,अशी क्रिडाप्रेमीची अपेक्षा आहे. 

क्रीडाविश्वात कोल्हापूरचे नाव राज्य, राष्ट्रीय पातळीवर घेतले जाते. ऑलंपिकसारख्या खेळांतही येथील खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी केली आहे. इतर जागतिक स्पर्धांत वेगळा ठसा उमटवला आहे. हे सर्व या खेळाडूंनी कोणत्याही सुविधांशिवाय केल्याचे मिरवण्यात आपल्याला मोठेपणा वाटतो. या खेळाडूंना सुविधा देण्यासाठीच महानगरपालिका असमर्थ आहे. कुस्तीचा समृध्द वारसा कोल्हापूरच्या अनेक तालमींनी जपला आहे. मात्र इथल्या मातीत तयार होणाऱ्या पैलवानांना स्थानिक स्पर्धाच उपलब्ध नसल्याचे विदारक चित्र आहे. या पैलवानांना स्पर्धांसाठी बाहेरगावी जावे लागते. अनेक पैलवान सध्या पुण्यात सराव करतात.

महानगरपालिकेतर्फे महापौर कुस्ती केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत होते. मात्र 2017 ला अखेरचा ठरलेला महापौर केसरो स्पर्धा पून्हा सुरु व्हावी, अशी अपेक्षा कुस्तीप्रेमीतून होत आहे. फुटबॉल आणि कोल्हापूर हे अतूट नाते आहे. महापौर चषक फुटबॉल स्पर्धांचे यापूर्वी आयोजन केले होते. मात्र 2018 ला ही स्पर्धा अखेरची झाली. 
महानगरपालिकेचा क्रीडा विभाग बंद आहे. या विभागाला अधिकाऱ्यांपासून ते तो चालवणाऱ्यांची कमतरता आहे. निव्वळ महानगरपालिकेच्या शाळामध्ये क्रीडास्पर्धा घेऊन हे अस्तित्व अबाधीत राहणे कठीण ठरणारे आहे. याबाबत मागणी होत असून हा क्रीडा विभाग सुरु व्हावा, अशी कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे. 

महानगरपालिकेने क्रीडा विभाग पून्हा सुरु करावा. या विभागाच्या पुनरुज्जीवनामुळे खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यास मदत मिळेल. याबाबत निवेदनही महापालिकेला दिले होते. 
- सुहास साळोखे,अध्यक्ष, राष्ट्रवादी क्रीडा सेल

महानगरपालिकेने कुस्तीच्या विकासासाठी महापौर केसरी कुस्ती स्पर्धा पुन्हा सुरु कराव्यात. यासाठी लागेल ते सहकार्य कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ करेल. येथील मातीत तयार होणाऱ्या पैलवानांना हे हक्काचे व्यासपीठ आहे. या स्पर्धांमुळे येथील कुस्तीचा विकास होणार आहे. 
- व्ही.बी.पाटील, अध्यक्ष, शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com