अज्ञात वाहनाच्या धडकेत मुरगूडचे मोटरसायकल स्वार जागीच ठार...

Murgaud's motorcycle rider killed in an unidentified vehicle crash
Murgaud's motorcycle rider killed in an unidentified vehicle crash

निढोरी - कागल राज्य मार्गावर भडगाव फाट्यानजीक आज पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलस्वार सतिश रामचंद्र म्हसवेकर (रा.मुरगूड, ता.कागल.वय ५२) हे जागीच ठार झाले.रात्रपाळीचे काम आटोपून घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. 

रात्रपाळीचे काम आटोपून घरी परतत असताना झाला अपघात

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सतिश म्हसवेकर (रा.मुरगूड, ता.कागल) हे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे काम करतात.रात्रपाळीचे काम आटोपून मुरगूड येथील घरी परतत असताना.निढोरी ते कागल रस्त्यावर भडगाव फाट्यानजीक आले असता अज्ञात वाहनाच्या धडकेत ते जागीच ठार झाले.त्यांच्या डोक्याला मोठी जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.अपघात होताच थोड्याच अंतरावर असलेल्या ऊस तोडणी मजुरांनी अपघातस्थळी धाव घेतलीव दूरध्वनी वरून त्यांच्या घरी माहिती कळविली.त्यानंतर घटनास्थळी मुरगूड पोलिस पोलीस दाखल झाले. म्हसवेकर यांच्या मागे पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com