चंदगडमधील अतिक्रमणे नगरपंचायत काढणार

Nagar Panchayat Will Remove Encroachments In Chandgad Kolhapur Marathi News
Nagar Panchayat Will Remove Encroachments In Chandgad Kolhapur Marathi News

चंदगड : शहरातील संभाजी चौकात व्यापाऱ्यांनी केलेली अतिक्रमणे, रस्त्यात थाटलेली दुकाने आणि याच ठिकाणी बस थांबत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. ती दूर करण्यासाठी अतिक्रमणे काढणे आणि येणारी बस व जाणारी बस यांचे स्वतंत्र बस थांबे करण्याबाबत चर्चा झाली. येथील नगरपंचायतीतर्फे बांधकाम विभाग, एसटी आगार, पोलिस ठाण्याच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते. नगराध्यक्षा प्राची काणेकर अध्यक्षस्थानी होत्या. 

वाहनांची वाढती संख्या पाहता शहरात संभाजी चौक (जुने बसस्थानक) व गुरुवार पेठेत सातत्याने वाहतुकीची कोंडी होते. ती दूर करण्याबाबत बैठकीत प्रत्येकाने मुद्दे मांडले. त्या अनुषंगाने चर्चा होऊन काही निर्णय घेतले.

संभाजी चौकापासून किमान 200 मीटर अंतरावर बस थांबा करणे, रिक्षा थांब्यासाठी जागा उपलब्ध करणे, प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांसाठी पंचायत समितीच्या प्रवेशद्वारासमोरील जागेत थांब्याची व्यवस्था करणे, गुरुवार पेठेत रस्त्यावर व गटारवर आलेले अतिक्रमण, घरांचे छत व इतर बांधकाम दूर करणे, खासगी वाहने रात्रंदिवस रस्त्यात लावली जातात ती दूर करणे, रस्त्यात आलेले बांधकाम साहित्य दूर करणे बाबत चर्चा झाली.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता पी. जी. कुलकर्णी, एसटी आगाराचे सुहास चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मेघा हुद्दार, पोलिस ठाण्यातर्फे आर. पी. किल्लेदार यांनी चर्चेत सहभाग घेतला. उपनगराध्यक्ष फिलोज मुल्ला, सर्व नगरसेवक, नगरसेविका, रिक्षाचालक, माल वाहतुकीचे चालक यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 

मुंबईहून येणाऱ्या गाड्यांची व्यवस्था करणार 
दरम्यान, मुंबई, पुणे व इतर ठिकाणांहून येणाऱ्या गाड्यांसाठी थांब्याची व्यवस्था करणे तसेच वाहने कशा प्रकारे लावायची याची नगरपंचायतीने आखणी करून देण्याचे ठरले. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com