esakal | नारायण राणे पोहचले विजयदुर्गवर अन्....
sakal

बोलून बातमी शोधा

Narayan Rane today visit at Vijaydurg fort

किल्ले विजयदुर्गच्या खाडीच्या बाजूची पूर्वेकडील तिहेरी तटबंदीमधील चिलखत तटबंदीच्या एका बुरूजाच्या पायथ्याचा संरक्षक भाग पावसामुळे कोसळला.

नारायण राणे पोहचले विजयदुर्गवर अन्....

sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

देवगड - शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणार्‍या तालुक्यातील किल्ले विजयदुर्गच्या चिलखत तटबंदीच्या एका बुरूजाच्या पायथ्याच्या संरक्षक भिंतीच्या ढासळलेल्या भागाची आज खासदार नारायण राणे यांनी पहाणी केली. किल्याच्या संवर्धनासाठी येत्या अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करून त्यासाठी ठोस निधीची तरतुद करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खासदार राणे यांनी यावेळी सांगितले. किल्याच्या डागडुजीबरोबरच स्थानिक पर्यटनाला चालना देण्यावर भर राहील असेही त्यांनी सांगितले.

किल्ले विजयदुर्गच्या खाडीच्या बाजूची पूर्वेकडील तिहेरी तटबंदीमधील चिलखत तटबंदीच्या एका बुरूजाच्या पायथ्याचा संरक्षक भाग पावसामुळे कोसळला. त्यामुळे भविष्यात किल्याच्या चिलखत तटबंदीला आणखी धोका निर्माण होण्याची शक्यता असून किल्याची डागडुजी गरजेची बनली आहे. बुरूजाच्या पायथ्याशी असलेल्या ढासळलेल्या संरक्षक भागाची पाहणी खासदार नारायण राणे यांनी केली.

यावेळी आमदार नीतेश राणे, माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, सभापती सुनील पारकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, जिल्हा परिषद शिक्षण, आरोग्य सभापती सावी लोके, सरपंच प्रसाद देवधर, उपसरपंच महेश बिडये, देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्रणाली माने, उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, आरिफ बगदादी, संजय बोंबडी, उत्तम बिर्जे, मुफीद बगदादी, प्रदीप साखरकर, जनार्दन तेली, संजना आळवे यांच्यासह अन्य पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. 

हे वाचा - सलाम या बळीराजाला! बैलांसाठी जीव धोक्‍यात, अनोख्या नात्याचे दर्शन

खासदार राणे यांनी ढासळलेल्या भागाची पाहणी केली. तसेच किल्याच्या समुद्राकडील भागाचीही पाहणी केली. तालुक्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या किल्याच्या डागडुजीसाठी अधिवेशनात प्रश्‍न मांडून याकडे लक्ष वेधणार आहे. ऐतिहासिक ठेवा जपण्याची आवश्यकता असून स्थानिक पर्यटन वाढीसाठीही आपले प्रयत्न राहतील असे सांगितले.

रायगडच्या धर्तीवर विकास व्हावा

किल्ले रायगड प्रमाणे किल्ले विजयदुर्गचा विकास झाला पाहिजे. किल्याचे जतन झाले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू असे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.

संपादन - मतीन शेख

go to top