'रिक्षा चालकांची वीज बीले माफ करावीत' 

Nation loving rickshaw association protest kolhapur
Nation loving rickshaw association protest kolhapur

कोल्हापूर - लॉकडाऊन काळातील रिक्षा चालकांची वीज बीले माफ करावीत. तसेच उर्वरित बीलामध्ये 75 टक्के सवलत द्या यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा राष्ट्र प्रेमी रिक्षा संघटनेतर्फे करवीर तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. 

रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा राष्ट्र प्रेमी रिक्षा संघटनेतर्फे करवीर तहसीलदार कार्यालयासमोर आज दिवसभर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी संघटनेने लॉकडाऊन काळात रिक्षा चालकांवर आलेल्या आर्थिक संकटाचा विचार करून त्यांची याकाळातील वीज बीले माफ करावीत. तसेच उर्वरित बीलांमध्ये 75 टक्के सवलत देऊन ती रक्कम भरण्यासाठी तीन टप्पे द्यावेत अशी प्रमुख मागणी केली. असंघटित रिक्षा चालकांचा विचार करून "रिक्षा चालक-मालक' कल्याणकारी महामंडळाची त्वरीत अमंलबाजावणी करावी. लॉकडाऊन काळात रिक्षा चालकांची विस्कटलेल्या आर्थिक घडीचा विचार करून त्यांना 50 हजारांचे अनुदान मंजूर करावे. त्याचबरोबर बेघर रिक्षा चालकांना हक्काचे निवास द्यावे अशा मागण्या करण्यात आल्या. याबाबतचे निवेदनही शिष्टमंडळाने नायब तहसिलदारांना दिले.

आंदोलनात शरद सोनुले, मारुती पोवार, विजय बोंद्रे, तानाजी निकम, दशरथ नंदीवाले, अमर पोवार, जनार्धन चोपडे समीर शेख, राम पाटील, संजय मांडरेकर, राजसंहस आळतेकर आदी सहभागी झाले होते. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com