आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेला विमानात प्रसूतिवेदना सुरू झाल्या : दोन तासांच्या या काळात स्ट्रेसमधून बाहेर काढले कोल्हापूरच्या तरुणाने

नंदिनी नरेवाडी-पाटोळे  | Tuesday, 12 January 2021

विमानात संकटकाळात धावला ‘देवदूत’ रमाकांत यांचे प्रसंगावधान  गर्भवतीला प्रसूतीवेदनांवेळी स्ट्रेसमधून काढले बाहेर

कोल्हापूर :आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेला विमानात प्रसूतिवेदना सुरू झाल्या : दोन तासांच्या या काळात स्ट्रेसमधून बाहेर काढले कोल्हापूरच्या तरुणाने

प्रतिकूल परिस्थितीला भेदत संशोधन, पेटंट आणि नावीन्यता यात कोल्हापूरची तरुणाई नक्कीच पुढे आहे. ही तरुणाई कोणत्याही प्रसंगाला धावत जाऊन भिडणारी आहे. आव्हानांना सोल्युशन पुरवणारी आहे. बुद्धीच्या जोरावर लौकिकात भर घालणारी आहे. ‘जगात भारी आम्ही कोल्हापुरी’ अशी या तरुणाईची ओळख दृढ झाली आहे. या तरुणाईचा युवा दिनानिमित्त आजपासून घेतलेला वेध... 

 टोरंटोहून ॲमस्टरडॅममार्गे भारतात येणाऱ्या विमानाने आकाशात झेप घेतली. आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेला प्रसूतिवेदना सुरू झाल्या. या वेळी सर्व चिंताग्रस्त झाले. अशाच वेळी कोल्हापूरच्या एका तरुणाने क्षणाचाही विचार न करता तिला स्ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालवले. दिल्ली विमानतळावर पोचण्यासाठी दोन तासांचा अवधी होता. संचारबंदीमुळे विमानाला भारतात प्रवेश दिला जाणार नाही, अशी नकारघंटा वाजली. पुन्हा माघारी परतण्याच्या सूचनेने महिला अस्वस्थ झाली. तरुणाने विमानात तिच्यावर उपचार केले आणि तिला स्ट्रेसमधून बाहेर काढले. पुढे तिची यशस्वी प्रसूती झाली. तरुणाच्या या कामगिरीबद्दल नेदरलॅंड विमान कंपनीकडून १०० युरोचे बक्षीस जाहीर केले. अशा या जिगरबाज तरुणाचे नाव रमाकांत रावसाहेब पाटील. 

Advertising
Advertising

हेही वाचा- कोल्हापूरकरहो करा तयारी; दोन दगडांवर हात ठेवणाऱ्या राजकारणाला मुद्द्यावर आणण्याची हीच वेळ-

कणेरी (ता. करवीर) येथे राहणारे रमाकांत सध्या कॅनडातील टोरंटोत राहतात. बंगळुरातील राजीव गांधी विद्यापीठातून नर्सिंग सायन्समधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात काम केले. त्यानंतर बेळगावमध्ये केएलईमधून मेडिकल सर्जिकल या विषयातून मास्टर्सची पदवी घेतली. क्रिटिकल केअरमध्ये त्यांनी स्पेशालिटी म्हणून ओळख निर्माण केली. उच्चशिक्षण घेतल्यानंतर इंग्लंड आणि कॅनडामधून त्यांना जॉब ऑफर येऊ लागल्या. परदेशात जाण्यासाठी ‘आयईएलटीएस’ या परीक्षेतही ते उत्तीर्ण झाले आणि परदेशात जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. २०१८ मधील ऑगस्टमध्ये ते कॅनडामध्ये नोकरीनिमित्त गेले. तेथे हेल्थ केअर असिस्टंट म्हणून काम सुरू केले. दरम्यान, हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा कोर्स पूर्ण केला. शिक्षण घेताना त्यांनी डायलेसिस रुग्णांवर संशोधन करण्यास सुरवात केली.  

हे आहे संशोधन
डायलेसिसचे उपचार घेणाऱ्या रुग्णांची डायलेसिस करण्यापूर्वी स्ट्रेस लेव्हल वाढते. स्ट्रेस लेव्हल वाढल्याने रुग्णांची प्रकृती गंभीर होण्याची शक्‍यता असते. हे टाळण्यासाठी रमाकांत यांनी रुग्णांना विशिष्ट व्यायाम करण्यास दिले. त्या व्यायामानंतर स्ट्रेस कमी आली. डायलेसिस करण्यापूर्वी व डायलेसिस पूर्ण झाल्यानंतर अशा नोंदी घेऊन यातील संशोधन त्यांनी पूर्ण केले. याच क्षेत्रात ते कॅनडात पीएचडी करणार आहेत.

संपादन- अर्चना बनगे