तूच माझा देव, तूच माझे सर्वस्व म्हणत हिंगणगाव खुर्द येथे मुलाने बांधले आईचे मंदिर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

हिंगणगाव खुर्द येथे मुलाने बांधले आईचे मंदिर

 कडेगाव (सांगली) : हिंगणगाव खुर्द (ता.कडेगाव) येथील अशोकराव शिवाजी वायदंडे यांनी आपल्या आईचे मंदिर बांधले असून आईलाच देवी मानून ते तिची उपासना करीत आहेत.

अशोकराव वायदंडे यांचा जन्म गरिब कुटुंबात झाला.मात्र मनाने श्रीमंत असणाऱ्या हरुबाई नावाच्या त्यांच्या आईने त्यांना व त्यांच्या भावंडाना गरिबीची जाणीव होऊ न देता वाढविले व चांगले संस्कार केले.त्या अतिशय अध्यात्मिक स्वभावाच्या होत्या,देवावर विश्वास ठेव,देव प्रत्येक संकटातून आपल्याला तारत असतो अश्या अनेक गोष्टी त्या अशोकराव यांना  सांगत होत्या.मात्र  तूच माझा देव व तूच माझे सर्वस्व आहेस असे अशोकराव आईला म्हणत असत.आईसाठी नवरात्रोत्सव म्हणजे आराधनेचा काळ होता.4 ऑक्टोबर 2000 रोजी नवरात्र उत्सवाच्या सातव्या दिवशी हारुबाईंनी पूजा व आरती केली आणि मला जाण्याची वेळ आली.मला जावे लागेल…मी जाणार…!  असे सांगितले आणि त्यांचे देहावसान झाले.

हेही वाचा- इचलकरंजीत पालिकेसमोर पेटवून घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यु -

अशोकरावांची आई देवाघरी निघून गेल्या.तर अशोकराव हे मातृशोकातुन धीरोदात्तपणे बाहेर येऊन ते मुंबईला गेले आणि तेथे सुरक्षा रक्षकांची नोकरी पत्करली.पुढे त्यांनी स्वतःची सुरक्षारक्षकांची कंपनी स्थापन केली.आता एक्स्पोर्ट आणि इम्पोर्टची कंपनीही त्यांनी सुरू केली आहे.आईच्या   आशीर्वादाने त्यांचा चांगला जम बसला.यामुळे त्यांनी सन 2011 मध्ये कळंबोली मुंबई येथे कंपनीत आणि त्यानंतर सन 2015 मध्ये जन्मगावी  हिंगणगावयेथेही आईचे आकर्षक मंदिर बांधले.

आईचे दर्शन आणि पूजा झाल्याखेरीज ते दैनंदिन कामकाजाला  सुरवात करीत नाहीत.त्यांच्या पत्नी सौ.संध्या यासुद्धाआईच्या मंदिरातील पूजा,नवरात्रोत्सवातील उपासना सर्व काही त्या मंत्रमुग्ध होऊन करतात.आई हरुबाईच्या नावावरून त्यांनी माताहरीओम नावाने त्यांचे मंदिर स्थापन केले आहे व त्यांची हुबेहूब मूर्ती स्थापन केली आहे.

संपादन - अर्चना बनेग

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navdurga special story Ashokrao Shivaji Vaidande kadegaon sangli