कोल्हापुरात आज दिवसभरात कोरोना रूग्णांची शंभरी पार 

new 112 corona patients in kolhapur
new 112 corona patients in kolhapur

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संखेमध्ये गेल्या चार पाच दिवसांमध्ये थोडी घट होत असली तरी रूग्ण वाढिची प्रमाण सुरूच आहे. आज दिवसभरात सायंकाळपर्यंत ११२ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्याता ४४ हजार ९६२ वर पोहोचली आहे. दुसरीकडे आज दिवसभरात २११ जण कोरोना मुक्त झाले आहेत तर चार कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यातील चौदा कोवीड सेंटरवर 40 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक बेड रिकामे झाले आहेत. सीपीआरमध्ये 310 हून अधिक गंभीर बाधितांवर विचार सुरू आहेत. आज  380 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत.

दरम्यान, मार्चमध्ये दाखल झालेल्या कोरोनाने ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये उच्चांक केला. या ६१ दिवसांच्या कालावधीत सप्टेंबरअखेर तब्बल ३८ हजार १०१ लोकांना कोरोनाची बाधा झाली. दररोज सरासरी ६१७ लोकांना कोरोना झाला. २५ मार्च ते ३१ जुलै या १२९ दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या ही सात हजार होती. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाची तीव्र लाट आली. ९ सप्टेंबरला जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे एक हजार ३१४ कोरोनाबाधितांची नोंद झाली. मोठ्या प्रमाणात वाढलेल्या रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यात यंत्रणा अपयशी ठरली. अनेक रुग्णांना वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने प्राण गमवावे लागले. १८ सप्टेंबरपासून रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र आहे.

 जिल्ह्यातील पहिल्या रुग्णाची नोंद २५ मार्चला शहरात झाली. २५ मार्च ते १६ मेपर्यंत कोरोना बाधितांची संख्या एक अंकी होती. तर १७ मे १४ जुलै या काळात ही संख्या दोन अंकी झाली. मात्र १५ जुलैपासून ते आजपर्यंत ही संख्या अपवाद वगळता तीन अंकीच राहिली आहे. सप्टेंबरमध्ये चार वेळा कोरोना बाधितांची संख्या चार अंकी झाली होती. त्या काळात रुग्णांना बेड शोधणे, त्यातही ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरचे बेड शोधणे आव्हान होते. 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com