ब्रेकिंग - कोल्हापुरात सायंकाळपर्यंत कोरोनाचे दीड शतक पार 

new 151 corona positive cases in kolhapur district
new 151 corona positive cases in kolhapur district

कोल्हापूर  - जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत काल उच्चांकी वाढ  झाल्यानंतर आजही नवे बाधित आढळून आले आहेत. आज सायंकाळपर्यंत जिल्ह्यात १५१ नव्या रूग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये शहरातील ७४ रूग्णांचा समामेश आहे. आज आलेल्या १५१ नव्या रूग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या सात हजार ४६७ इतकी झाली. सध्या एकूण चार हजार ५० कोरोनाबाधितांवर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

आज पाॅझिटिव्ह आलेल्यांमध्ये कोल्हापूर शहर 74, हातकणंगले 27, पन्हाळा 3, भुदरगड 1, गडहिंग्लज 1, कागल 6, शिरोळ 3, 
करवीर 20, इचलकरंजी 10, आजरा 2, चंदगड 1, तर गगनबावड्यातील तिघांचा समावेश आहे. 

दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढू लागल्याने शहरातील रुग्णालयात बेडचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बाधितांना ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात दाखल केले जात आहे. त्यानुसार काल जवळपास २०० हून अधिक रुग्णांना ग्रामीण भागातील शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यापैकी ज्यांची प्रकृती गंभीर आहे, अशा ३२ रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय तसेच कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचारांसाठी आणण्यात आले. जिल्ह्यातील सहा शासकीय रुग्णालयांत झालेल्या आरोग्य तपासणीत एक हजार २१६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत.  

 ग्रामीण भागातील प्रमाण वाढले
कोरोनाबाधितांचे प्रमाण ग्रामीण भागात विशेषतः दाटीवाटीच्या भागात जास्त आहे. यात स्थानिक व्यक्तीच कोरोनाबाधित येत असल्याने भीती व्यक्त होत आहे.

तपासणीचा वेग वाढला अन्‌ बाधितांची संख्याही
शेंडा पार्क येथील सूक्ष्मजीव विभागात नवीन आणखी एक स्वॅब तपासणी मशिन बसविण्यात आले. यामुळे काल दिवसभरात स्वॅब तपासणीची संख्या वाढली.  


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com