esakal | ब्रेकिंग - कोल्हापूरमध्ये कोरोनाचा कहरच ; आणखी २४२ जणांना कोरोनाची बाधा...
sakal

बोलून बातमी शोधा

new 242 covid patient found in kolhapur total covid patient count 6785

रविवारी सकाळी कोरोना ने कहर सुरू केला आहे आज दुपारपर्यंत 242 व्यक्ती बाधित आढळल्या

ब्रेकिंग - कोल्हापूरमध्ये कोरोनाचा कहरच ; आणखी २४२ जणांना कोरोनाची बाधा...

sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी सकाळी कोरोना ने कहर सुरू केला आहे आज दुपारपर्यंत 242 व्यक्ती बाधित आढळल्या. जिल्ह्यातील बाधितांचा आजपर्यंतचा आकडा सहा हजार 785 झाला आहे. आज सकाळी आलेल्या अहवालामध्ये कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील तब्बल पन्नास तर हातकणंगले तालुक्‍यातील 55 रुग्ण आढळून आले आहेत.


 जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे .जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बाधित व्यक्तींची संख्या अधिक होऊ लागली आहे. रविवारी आलेल्या अहवालात तब्बल 242 जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील आकडा 6 हजार 785 वर जाऊन पोहोचला आहे.

हेही वाचा- कोल्हापूरमध्ये आता एका आठवड्यात होणार पाच हजारांवर स्वॅबची तपासणी -


 आज सकाळी आलेल्या अहवालात हातकणंगले तालुक्‍यातील 55 रुग्णांचा समावेश आहे तर कोल्हापूर शहरातील संख्याही  वाढत असून आज पुन्हा पन्नास जण पॉझिटिव आले आहेत. याच बरोबर करवीर तालुक्यातील 37 पन्हाळा 24 राधानगरी 1 गडिंग्लज 2 कागल 27 भुदरगड 14 राधानगरी 18 तर शिरोळ येथील 18 रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा- रूग्णालयांनी जादा बील घेतल्यास शिवसेनेशी गाठ...  कोणी दिला इशारा वाचा... -

 
कोरोनामुक्तांची वाढती संख्या दिलासादायक
गेल्या २० दिवसांत बाधितांची संख्या वाढती असली तरी शासकीय रुग्णालयातील प्रभावी उपचारांमुळे कोरोनामुक्तांची संख्याही वाढते आहे. आठ दिवसांपूर्वी अवघ्या ३० ते ३५ व्यक्ती कोरोनामुक्त होत होत्या. तीन दिवसांत ही संख्या दुप्पट झाली असून, आज एका दिवसात १२६ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. रुग्णांपैकी ५२७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. प्रतिकारशक्ती उत्तम असणारे १४ दिवसांच्या आतच कोरोनामुक्त होत आहेत. 

हेही वाचा- महापालिका क्षेत्रात शनिवारी सापडले 92 नवे पॉझिटिव्ह


परजिल्ह्यांतून आलेले १८ बाधित
 काल दिवसभरात परराज्यांतून तसेच परजिल्ह्यांतून कोल्हापुरात आलेल्या व येथेच क्वारंटाईन असलेल्या १८ व्यक्ती बाधित आढळलेल्या आहेत. यात सातपेक्षा अधिक व्यक्तींनी मुंबईहून प्रवास केला आहे. चार व्यक्ती पुण्यातून आल्या आहेत. अन्य व्यक्ती बाहेरगावच्या आहेत.

go to top