esakal | Gram Panchayat Results : राधानगरीत चुरस नवीन आघाड्यांना यश

बोलून बातमी शोधा

new candidate win the grampanyat election radhanagari kolhapur}

आनाजे येथेही सत्तांतर झाले असून भोगावतीचे माजी संचालक यांच्या गटाला दोन विरोधी गटाला सात जागा मिळाल्या आहेत.

Gram Panchayat Results : राधानगरीत चुरस नवीन आघाड्यांना यश
sakal_logo
By
राजू पाटील

राधानगरी (कोल्हापूर) : राधानगरी तालुक्यातील तळाशी येथे मारुतराव जाधव यांच्या गेल्या अनेक वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागला. त्यांच्या शिवसेनेला चार, तर विरोधी उमेदवार विजय जाधव यांच्या आघाडीला पाच जागा मिळाल्या. आनाजे येथेही सत्तांतर झाले असून भोगावतीचे माजी संचालक यांच्या गटाला दोन विरोधी गटाला सात जागा मिळाल्या आहेत.

मारुतराव गुरुजी यांच्या सत्तेला सुरुंग लागला. त्यांच्या शिवसेनेला चार तर विरोधी विजय जाधव यांच्या आघाडीला पाच जागा मिळाल्या. आनाजे येथे भोगावतीचे संचालक दिनकर पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या गटाला दोन, तर विरोधी गटाला सात जागा मिळाल्या. कंथेवाडी येथे सत्ता कायम राहिली. जनता दलाला चार तर शेकाप पक्ष आघाडीला ३ जागा मिळाल्या.

हेही वाचा - नऊ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार काही गावांमध्ये सत्तांतराचा कल

नरतवडे येथे महाविकास आघाडीला सर्वच्या सर्व नऊ जागा मिळाल्या. विरोधी मात्र शून्यावर राहिले. राजापूर येथे राष्ट्रवादीची सत्ता कायम राहीली असून मांजरेकर गटाला चार तर तळेकर गटाच्या तीन बिनविरोध झाल्या आहेत. खिंडी वरवडे येथे सत्ता कायम राहिली. तर गुडाळ येथे महाविकास आघाडीला दहा जागा तर विरोधी संग्राम पाटील यांची एक जागा निवडून आली आहे

संपादन - स्नेहल कदम