new eleven corona case in kolhapur
new eleven corona case in kolhapur

कोल्हापुरात आज दिवसभरात बारा रूग्णांची भर 

कोल्हापूर  - जिल्ह्यात आज दिवसभरात 12 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 880 इतकी झाली आहे. दिवसभरात 1 व्यक्ती कोरोनामुक्त झाली असून आजवर एकूण 726 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. एकूण 142 कोरोनाबाधितांवर सीपीआरसह अन्य पाच शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सद्या कोरोनाची चिंता वाढतीच आहे. 

जिल्ह्यातील 14 कोवीड सेंटरमध्ये दाखल असलेल्यांपैकी 126 व्यक्तींचे स्वॅब अहवाल आज प्राप्त झाले असून यातील 102 व्यक्तींचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आलेत तर उर्वरीत बारा व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यात गडहिंग्लज 3, हातकणंगले 1, शिरोळ 1, इचलकरंजी 6, अन्य राज्यातील 1 इतक्‍या व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्व कोरोनाग्रस्त सिपीआर व गडहिंग्लज, इचलकरंजी येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. 

उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्तांत एकूण दहाजणांची प्रकृती गंभीर आहे. तर उर्वरीतांची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यातील सहा शासकीय कोवीड सेंटरवर आज झालेल्या आरोग्य तपासणीत बाहेरगावावरून आलेल्या 406 व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. त्याचे अहवाल लवकरच उपलब्ध होतील. 

इचलकरंजीत बाधितांची संख्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर 
 
शहरात सलग दहाव्या दिवशी कोरोनाचा कहर सुरूच आहे. येथील त्रिशूल चौक कनेक्‍शनमधून गोकुळ चौक परिसरातील एका महिलेसह दोघांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये बाधित मृत व्यक्तीचे दोन्हीही नातेवाईक आहेत. शहरातील कोरोना बाधितांची संख्या 48 वर पोहचली आहे. 

कुडचे मळापाठोपाठ आता गावभागातील त्रिशूल चौक कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. आज सांयकाळपर्यंत परिसराच्या कनेक्‍शनमधून सातजण सापडले आहेत. यातील प्रथम संसर्ग झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. वृद्धाच्या चार नातेवाइकांचे यापूर्वीच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज आणखी दोन नातेवाइकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वैद्यकीय अहवालातून पुढे आले आहे. यामध्ये यापूर्वी बाधित महिलेच्या 35 वर्षीय पतीचा समावेश आहे. ते मूळचे कोल्हापूरचे आहेत; पण सध्या ते येथेच राहत असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली. गोकुळ चौक परिसरातील 52 वर्षीय महिलेलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे; मात्र ही महिला आसरानगर परिसरातील नातेवाईक महिलेकडे राहत असल्याचे कळते. आतापर्यंत शहरात 48 बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

कुडचे मळा कनेक्‍शनमधून आतापर्यंत 32 जण तर त्रिशूल चौक कनेक्‍शनमधून 7 जण बाधित झाले आहेत. तीन बाधिरुग्ण मृत झाले आहेत. सहाजण यापूर्वीच कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. अद्याप 39 ऍक्‍टीव्ह रुग्ण आहेत. 

दरम्यान, सकाळच्या सत्रात 12 जणांचे स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये त्रिशूल चौकासह जूना चंदूर रोड परिसरातील नागरिकांचा समावेश आहे. तर आज दिवसभर 50 हून अधिक स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे. 

"त्या' रिक्षा चालकाचा अहवाल निगेटिव्हच 
इचलकरंजी येथील त्या कोरोनाग्रस्ताचा काल बुधवारी मृत्यू झाला. त्यास कोल्हापूरातून इचलकरंजीत रिक्षातून सोडणारा रिक्षा चालक कोल्हापूरात क्वारंटाइन आहे, त्यांचा स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला आहे. 


तालुकानिहाय कोरोनाग्रस्तांची संख्या अशी ः 
आजरा 81, भुदरगड 76 ,चंदगड 94, गडहिंग्लज 105, गगनबावडा 7, हातकणंगले 16, कागल 57, करवीर 26, पन्हाळा 29, राधानगरी 69, शाहूवाडी 186, शिरोळ 10, इचलकरंजी 59, कोल्हापूर शहर 47, अन्य राज्य 18 

एकूण कोरोनाग्रस्त --- 880 
एकूण कोरोनामुक्त---- 726 
मृत्यू -----------------12 
सद्या उपचार घेणारे ----142 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com