breaking - कोल्हापुरात आणखी अकरा जणांना कोरोनाची लागण 

new eleven corona positive case in kolhapur district
new eleven corona positive case in kolhapur district

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबता-थांबत नाही. काल २४ रूग्णांची वाढ झाल्यानंतर आता आलेल्या अहवालानुसार आणखी अकरा जणांना कोरोची लागण झालेचे स्पष्ट झाले आहे. या अकरा रूग्णांसह जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ९७६ वर पोहोचली आहे. 


आज पाॅझिटिव्ह आलेल्यांमध्ये आजरा तालुक्यातील सर्वाधिक 5 रुग्णांचा समावेश आहे. आज दिवसभर एकही रुग्ण आढळला नव्हता, त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असतानाच रात्री मात्र रुग्णांची भर पडली. यात हातकणंगले दोन,  इचलकरंजी एक, भुदरगड एक, गडहिंग्लज दोन तर आजऱ्यातील पाच जणांच समावेश आहे. 

सामाजिक संसर्ग वाढतोय
इचलकरंजी, शिरोळ, गडहिंग्लज, चंदगड येथे पाच दिवसांत कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ होत आहे. सोलापुरातून आलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले नवे रुग्ण इचलकरंजी व शिरोळ येथे सापडत आहेत. तर मुंबईतून आलेल्या कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती चंदगड, गडहिंग्लज तालुक्‍यात अधिक संख्येने सापडत आहेत. त्यामुळे सामाजिक संसर्ग वाढू लागल्याचे चित्र या भागात ठळक आहे.

काल २४ नव्या रुग्णांची भर 
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काल २४ व्यक्तींची भर पडली. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९७६ झाली. काल दिवसभरात ४ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. त्यामुळे कोरोनामुक्तांचा आकडा ७४३ झाला आहे. २०९ कोरोना रुग्णांवर सीपीआरसह अन्य सहा शासकीय रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यातील १४ कोविड सेंटरमध्ये दोन दिवसांत घेतलेल्या स्वॅबचे अहवाल काल आले. यात क्वारंटाईन असलेल्या २४ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. चंदगड ६, हातकणंगले ३, करवीर १, राधानगरी २, शिरोळ २, इचलकरंजी ९ इतक्‍या व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत.    

क्वारंटाईन असलेल्यांपैकी ३६४ व्यक्तींचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले आहेत. वरील सर्व रुग्णांवर सीपीआर, आयजीएम इचलकरंजी, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज आदी शासकीय रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरम्यान, एसटीच्या विभागीय कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
उपचार घेणाऱ्यांपैकी दहा रुग्णांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. तर उर्वरितांची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यातील १२ शासकीय रुग्णालयांत झालेल्या आरोग्य तपासणीत ५२९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com