ब्रेकिंग- कोल्हापुरात कोरोना रूग्णांची संख्या चारशेजवळ, आणखी सहा जण पाॅझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

आज साकाळी सापडलेल्या रूग्णंपैकी शाहूवाडी तालुक्यातील पाटणे 3, जांभूर 2, थावडे 1, सित्तूर-वरुण 1 तर किरवडे (भुदरगड) येथील 1 जणांचा समावेश आहे.

कोल्हापूर - जिल्ह्याता कोरोना रूग्णांची संख्या आता चारशेजवळ पोहोचली आहे. आज साकळी आठ नव्या रूग्णांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आल्यानंतर नुकत्याच हाती आलेल्या अहवालानुसार आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सकाळचे आठ आणि आताच्या सहा रूग्णांसह जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या ३९७  वर पोहोचली आहे. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, आज साकाळी सापडलेल्या रूग्णंपैकी शाहूवाडी तालुक्यातील पाटणे 3, जांभूर 2, थावडे 1, सित्तूर-वरुण 1 तर किरवडे (भुदरगड) येथील 1 जणांचा समावेश आहे.
अहवाल पॉझिटिव्ह आलेले सर्व जण अलगीकरण कक्षात असून त्यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे काम सुरू आहे.

हे पण वाचा - 'ते' चोघे निघाले पॉझिटिव्ह अन् अधिकारी,कर्मचारी धास्तावले... 

गेल्या चाैदा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संखेत रोज वाढ होत असाताना काल थोडा दिलासा मिळाला आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात केवळ पाच नव्या रूग्णांची भर पडली आहे. 

हे पण वाचा -  ....गावचा गोडवा हरवतोय ; एका फोनवरील मन हेलावणारी करून कहाणी

जिल्ह्यात काल दिवसभर 1762 करून तपासणी अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र, रात्री सव्वानऊ वाजता आलेल्या रिपोर्टनुसार नव्याने पाच कोरोना रुग्णांची भर पडली होती. त्यामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात 3९७ रुग्णांची नोंद झाली आहे तर कोरोनामुक्त झालेल्या सहा जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे होऊन घरी गेलेल्या एकूण रुग्णांची संख्या २० वर पोचली आहे. तीन रुग्णांचा यापूर्वीच मृत्यू झाला असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new six corona positive patient in kolhapur