गडहिंग्लजला "सोशल डिस्टन्स' धाब्यावर 

No Awareness About Social Distance In Gadhinglaj Kolhapur Marathi News
No Awareness About Social Distance In Gadhinglaj Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : शहरात तीन दिवसांच्या लॉकडाऊननंतर आज भाजी खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली. किराणा दुकानांसमोर लांबपर्यंत रांगा लागल्या. उद्यापासून (ता. 2) शहरात पुन्हा तीन दिवस लॉकडाऊन जाहीर झाल्याने घाबरून आज नागरिकांच्या गर्दीत भर पडली. यामुळे कोरोना व्हायरस रोखण्यासाठी आवश्‍यक असलेले सोशल डिस्टन्सिंगही नागरिकांनी अक्षरश: धाब्यावर बसविले. 

पालिकेने 29 ते 31 मार्चपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर केला. या कालावधीत केवळ मेडिकल दुकाने आणि दूध विक्री केंद्र सुरू केले होते. भाजी व किराणा मालाची दुकाने बंद होती. मंगळवारी (ता. 31) हा कर्फ्यू संपला. आज एकच दिवस सायंकाळी चार ते आठपर्यंत किराणा व भाजी खरेदीसाठी मुभा दिली होती. परिणामी आज शहराला आठवडा बाजाराचे स्वरूप आले होते. 
पालिकेने नऊ प्रभागांत 23 ठिकाणी भाजी केंद्राची सोय केली आहे. जवळच्या केंद्रात भाजी न घेता नागरिकांनी शहरभर फिरून भाजी घेत होते. यामुळे शहरात सर्वत्र गर्दी दिसून आली. परिणामी पालिकेने केलेले हे नियोजन विस्कळीत झाले. 

किराणा दुकानांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नव्हती. शहरात 26 किराणा दुकाने आहेत. प्रत्येक दुकानांसमोर नागरिकांनी रांगा लावल्या. धान्याच्या दुकानांसमोरील रांगा अधिकच लांब होत्या. आज एकाच दिवशी सायंकाळी चार ते आठ या कालावधीसाठीच खरेदीची मुभा असल्याने नागरिकांची गर्दी दिसून आली. पालिकेचे कर्मचारी प्रत्येक भाजी विक्रेता व नागरिकांना सूचना करूनही रांगा लागत नव्हत्या. परिणामी नागरिकांच्या गर्दीसमोर तोकड्या कर्मचाऱ्यांचे प्रयत्न अपुरे पडले. स्वत: मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर हेसुद्धा रस्त्यावर उतरले, तरीही गर्दी नियंत्रणात येत नसल्याचे चित्र होते. 
.. 
नागरिकांत वाद 
सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी दुकान आणि भाजी केंद्रापुढे केलेल्या चौकोनाच्या नियोजनाला नागरिकांनी पायदळी तुडवले. सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याबाबत काही नागरिक सूचना करत होते; परंतु गर्दी असल्याने सूचनांचा सकारात्मक परिणाम न होता उलट वादाचे प्रसंग घडले. पालिका कर्मचाऱ्यांनीही डिस्टन्ससाठी प्रयत्न केले; मात्र नागरिकांनी त्यांनाही दाद दिली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com