भारीच की पैलवान मंडळी ! राजर्षी शाहू जयंती निमित्त गंगावेशच्या मल्लांनी केला 'हा' संकल्प...

शनिवार, 27 जून 2020

गिरोली घाट परिसरात पठारावर मोठया प्रमाणात विदेशी वनस्पतींची लागवड केल्याने देशी झाडे नामशेष होत आहेत.

जोतिबा डोंगर - राजर्षी शाहू जयंतीच्या निमिताने कोल्हापूरातील शाहू विजयी गंगावेश तालमीच्या पैलवानांनी गिरोली, पोहाळे, जोतिबा भागातील ओसाड डोंगर हिरवेगार करुन सुंदर करण्याचा संकल्प केला आहे . त्यांनी काल पोहाळेतील बिबीची खडी (डोंगर पठार) या ठिकाणी वड, आंबा, चिंच, पिंपळ जांभूळ या प्रकारची देशी झाडे लावलीत. ती जतन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय.

पोहाळे तर्फ आळते ता. पन्हाळा या गावापासून पुढे गेल्यावर नागमोडी वळणांचा गिरोली घाट सुरु होतो. तसेच डोंगर पठारे ही दिसू लागतात. या पठारावर मोठया प्रमाणात विदेशी वनस्पतींची लागवड केल्याने देशी झाडे नामशेष होत आहेत. ही अडचण ओळखून गेल्या स्थानिक ग्रामस्थ, निसर्ग, पर्यावरणप्रेमी, यांनी देशी झाडे लावण्यासाठी सुरूवात केली आहे. कोल्हापूरातील गंगावेश तालमीचे पैलवान व कार्यकर्ते मंडळीना सुध्दा ही बाब लक्ष्यात आली आणि त्यांनी देशीच झाडे लावण्याचे ठरविले. त्यांनी ज्या डोंगर पठारावर रिकामी जागा आहे. तेथे ही देशी झाडे लावण्याचे ठरविले आहे.

वाचा - कुस्तीतील लाईव्ह कॉमेंट्री कशी करतात तुम्हाला माहित आहे का ? जाणुन घ्या...

या पैलवानांचे वारणा कोडोली परिसरात जाण्यासाठी गिरोली घाटातून जाणे येणे असायचे. त्यांच्या निर्दशनास काही ठिकाणांचे डोंगर रिकामे दिसले. त्यांना असे वाटले की या ठिकाणी डोंगर हिरवे झाले पाहिजे. प्राणी, पशू , पक्षी जगले पाहिजे.पर्यावरणाचे संर्वधन झाले पाहिजे म्हणून ही झाडे लावण्याची मोहिम पैलवांनी हाती घेतली आहे.स्थानिक ग्रामस्थ,पर्यावरण प्रेमी यांचे सुध्दा त्यांना सहकार्य लाभत आहे .

पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावण्याची आज मोठी गरज आहे.माणसाबरोबर प्राणी,पशू,पक्षीही जगला पाहिजे . त्यासाठी माणसाने एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे.पैलवानांना कुस्ती ही मातीवर प्रेम करायला शिकवते म्हणुन आम्ही या संकल्पातून मातीचे ऋण व्यक्त करणार आहोत.

- पै.माऊली जमदाडे (महान भारत केसरी )