धक्कादायक : गावाच्या नावातील गफलतीने घेतला जीव 

old woman died because two village name list problem kolhapur
old woman died because two village name list problem kolhapur

हळदी (कोल्हापूर) - कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांची यादी तयार करताना गावाच्या नावात झालेल्या गफलतीमुळे कांडगावमधील 75 वर्षीय महिलेस उपचाराअभावी जीव गमवावा लागला. करवीर तालुक्‍यातील कांडगाव आणि कंदलगाव या दोन गावांच्या नाम साधर्म्यामुळे हा प्रकार घडला. 

चार दिवसापूर्वी कांडगाव येथील 75 वर्षीय महिलेला दम्याचा त्रास असलेने सीपीआरमध्ये उपचारासाठी घेवून गेले होते. सहा ऑगस्ट रोजी त्यांचा स्वॅब घेवून घरी पाठविले होते. त्या महिलेला दम्याचा त्रास असल्याने त्यांना घरीच ऑक्‍सिजनची सोय केली होती. अहवाल आला नाही म्हणून चौकशी केली असता, सोमवारी सकाळीच संबंधित महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यामध्ये कांडगाव ऐवजी कंदलगाव लिहिल्याने गावात निरोप समजला नसल्याचे तसेच दिलेल्या मोबाईल नंबरमध्ये एक अंक चुकीचा असल्याने तो बाहेरील जिल्ह्यात लागत असल्याचे आज सकाळी समजले. 

दरम्यान, कंदलगावमध्ये संबंधित नावाची महिलाच नसल्याची खात्री होईपर्यंत गावात संभ्रम निर्माण झाला. 

कांडगावमध्ये आज संबंधित महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समजताच धावपळ उडाली. तत्काळ महिलेला कोविड केंद्रात दाखल करण्याच्या हालचाल सुरु केल्या. कोल्हापूरमध्ये बेड शिल्लक नसल्याने कुरुकली येथील कॉलेजच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला गेला. तत्पूर्वी कुरुकली येथील केंद्रात ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था केली. पण बाधित महिलेला उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच केंद्राच्या बाहेरच मृत्यू झाला. खबरदारी म्हणून मृतदेहाला सुरक्षित ठेवून सोबतच्या चार लोकांना पी.पी.ई. कीट देण्यात आले. तसेच याच चार लोकांनी अंत्यविधी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

दरम्यान, गेल्या तीन-चार दिवसांमध्ये महिलेला पाहण्यासाठी गेलेल्यांचे तसेच त्यांच्या घरच्यांच्या संपर्कात आलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. या घटनेबरोबरच गावातील आणखी एका 70 वर्षीय व्यक्तीला धाप लागणे व न्यूमोनिया या त्रासामुळे कोल्हापूर सीपीआरमध्ये दाखल केले होते. त्या व्यक्तीचा देखील काल पहाटेच मृत्यू झाला.

आज सकाळी त्या व्यक्तींचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील तीन दिवस कांडगाव मधील सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com