कोल्हापुरात 24 तासात कोरोनाचा एक बळी 

one corona patient dead in kolhapur
one corona patient dead in kolhapur

कोल्हापूर - जिल्ह्यात गेल्या 24 तासात 12 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत तर 59 व्यक्ती कोरोना मुक्‍त झाल्या आहेत. एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. एकूणच कोरोनाबाधितांची संख्या आणखी कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. 

नव्या दोन गंभीर कोरोनाबाधितांना सीपीआर रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जिल्हाभरातील सर्व कोवीड सेंटरवर मिळून 307 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. तर 60 वर्षी व्यक्तीचा कोरोना व अन्य गुंता गुंतीच्या आजारामुळे सीपीआर मध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. 

दरम्यान जिल्ह्यातील 16 कोवीड सेंटरवर गेल्या 24 तासात 193 हून अधिक व्यक्तींची स्वॅब तपासणी केली आहे. त्यांचे अहवाल लवकरच मिळणार आहेत. 

एकूण कोरोना बाधित ः 49 हजार 110 
कोरोना मुक्त ः 47 हजार 116 
कोरोना मृत्यू ः 1 हजार 687 
उपचार घेणारे ः 307 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com