कोल्हापुरात 20 नवे कोरोनाबाधित ; 24 तासात एक बळी 

one corona patient dead in kolhapur
one corona patient dead in kolhapur

कोल्हापूर - जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 20 बाधित सापडले तर 20 कोरोनामुक्त झाले. एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोवीड सेंटरवर मिळून बाधित व्यक्तींवर उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी झाली असून सद्या 49 बाधितांवर उपचार सुरू आहेत. यापैकी 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. उर्वरित सर्वांची प्रकृती स्थिर आहे. 

पाच दिवसांपासून कोरोनावर उपचार सुरू असलेल्या एका पुरुषाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. ही व्यक्ती कोल्हापूर शहरातील असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. अवकाळी पावसाने वातावरणात अचानक बदल झाला आहे. त्यामुळे मधुमेह, हृदयविकार, फुप्फुसातील संसर्ग, श्‍वसन विकार अशी लक्षणे असणाऱ्यांनी कोणतेही लक्षणे अंगावर न काढता वेळीच तपासणी उपचार घ्यावेत अशी अपेक्षा शासकीय आरोग्य यंत्रणेने व्यक्त केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 14 कोवीड सेंटरवर गेल्या 24 तासात 151 हून अधिक व्यक्तींची स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. 

 
कोरोनाबाधित ः 49 हजार 589 
कोरोना मुक्त ः 47 हजार 830 
कोरोना मृत्यू ः 1 हजार 710 
उपचार घेणारे ः 49 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com