कोल्हापूर ; आजर्‍यानजिक दुचाकी घसरून एकाचा मृत्यू

one dead in accident at kolhapur gadhinglaj
one dead in accident at kolhapur gadhinglaj

आजरा (कोल्हापूर) : आजरा - गडहिंग्लज मार्गावर मुंगुसवाडी फाट्यानजिक दुचाकी घसरून रस्त्यावर आपटल्याने इब्राहिम महंमद मुराद (वय ६७ रा. दर्गा गल्ली आजरा) हे वृध्द गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. 

याबाबतची फिर्यास आजरा पोलीस ठाण्यात शकील इब्राहिम मुराद यांनी दिली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, इब्राहिम मुराद हे गडहिंग्लज येथून प्रापंचिक साहित्य घेऊन आपल्या गाडीवरून (एमए०९ ई ४८७४) आजर्‍याकडे येत होते. ते भरधाव वेगाने येत असताना मुंगुसवाडी फाट्यानजिकच्या स्पीडब्रेकरवर त्यांची गाडी सध्या सुरू असलेल्या जोराच्या पावसामुळे घसरली. यात मुराद हे रस्त्यावर जोरात आपटले गेले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय आजरा येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com