ब्रेकिंग - कोल्हापुरात कोरोनाचा आणखी एक बळी ; संख्या पोहोचली...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

इचलकरंजीतील मृत्यूची संख्या आता दहावर पोहोचली आहे. 

कोल्हापूर - गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोनाच्या संखेत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच आता मृत्यूचेही प्रणाण वाढू लागले आहे. याआधी जिल्ह्यात कोरोनामुळे २५ जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. त्यातच आज आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या आता २६ वर पोहोचली आहे. इचलकरंजीतील एका ६० वर्षीय व्यक्तीचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे इचलकरंजीतील मृत्यूची संख्या आता दहावर पोहोचली आहे. 

रूग्णांमध्येही वाढ 
दरम्यान इचलकरंजीमध्ये कोरोनाच्या रूग्णांमध्येही वाढ होत आहे. शहरात काल कोरोनाचा उद्रेक झाला. दिवसभरात तब्बल 21 नवेे रुग्ण आढळले आहेत. मॉडर्न हायस्कूल नजिकचा परिसर शहरातील कोरोनाचा नवा हॉट स्पॉट ठरला आहे. नांदणी व्हाया टाकवडे अशा कनेक्शनमधून या परिसरात रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. आता पर्यंत शहरात 128 रुग्णांची संख्या झाली असून त्यापैकी 79 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत.

हे पण वाचा - कोल्हापूरात लॉकडाऊन नाही : पालकमंत्री सतेज पाटील 

इचलकरंजी शहरात कोरोनाचे कहर सुरुच आहे. रुग्णांची संख्या वाढतच आहे. आज एका दिवसात विक्रमी 21 रुग्ण आढळले. काल शनिवारी 9 रुग्ण आढळले होते. रात्री उशिरा आणखी 5 रुग्णांची भर पडली. त्यानंतर सकाळपासून रुग्णांची वाढ होत गेली. रात्री नऊ वाजेपर्यंत 16 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण 21 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येने सव्वाशेचा टप्पा पार केला. विशेष म्हणजे शहरातील प्रत्येक भागात आता रुग्ण आढळून येत असल्यांने प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्याही वाढत आहे. आता पर्यंत किमान 70 हजारहून अधिक नागरिक या क्षेत्रात आले आहेत. 

मॉडर्न हायस्कूल परिसर नवा हॉट स्पॉट
शहरात यापूर्वी कुडचे मळा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. आता मॉडर्न हायस्कूल नजिकचा परिसर नवीन हॉटस्पॉट ठरत आहे. गेल्या दोन दिवसांंत या परिसरातील बेपारी गल्ली, आंबेडकरनगर मधील दोन कुटुंबातील 12 पेक्षा जास्त जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नांदणी व्हाया टाकवडे मार्गे या परिसरात संसर्ग झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. यातील बहुतांशी अहवाल हे खासगी प्रयोग शाळेतील तपासणीतून पॉझीटीव्ह आले आहे. 

या शिवाय त्रिशुल चौक परिसरात आणखी दोघेजण तर शांतीनगर परिसरात पहिलाच कोरोना रुग्ण आज सापडला. गणेशनगरमध्ये आणखी दोन तर आतापर्यंत सातजणांना कोरोना संसर्ग झाला आहे. महासता चौक परिसरातील कोरोना बाधीत मयत महिलेच्या दोन नातेवाईक बाधीत झाले आहेत. लिंबू चौक रिंगरोडवरील महादेवनगरमधील दाम्पत्याचा अहवाल पॉझीटिव्ह आला आहे. 
 
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one more death of corona patient in kolhapur