ज्याच्यावर उपचार केले, तोच निघाला पॉझिटिव्ह...

The one who was treated, went positive ...
The one who was treated, went positive ...

जयसिंगपूर : शहरातील एका रुग्णालयात उपचार घेणारा रुग्ण पॉझिटिव्ह आढळला. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांना शहरातील पंधराव्या गल्लीतील हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यावरुन स्थानिक नागरीक आणि डॉक्‍टरांमध्ये वाद झाला. डॉक्‍टरांकडून नागरिकांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करुनही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर नगरसेवक पराग पाटील यांनी स्वत:च्या हॉटेलवर डॉक्‍टरांना क्वॉरंटाईन करण्याचा तोडगा काढल्याने वाद निवळला. 

शहरातील एका हॉस्पिटलमध्ये येवून गेलेला रुग्ण पॉझिटिव्ह आढळला. यानंतर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांना शहरातील पंधराव्या गल्लीतील हॉस्पिटलमध्ये क्वॉरंटाईन करण्यात आले. प्रशासनाच्या रितसर परवानगीने हॉस्पिटल केवळ डॉक्‍टरांसाठी क्वॉरंटाईनकरीता उपलब्ध करण्यात आले आहे. मात्र, डॉक्‍टरांच्या क्वॉरंटाईनला स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केला. डॉक्‍टरांनी उपचार केले असले तरी अद्याप डॉक्‍टर पॉझिटिव्ह आले नाहीत. त्यांचा स्वॅब घ्यायचा आहे. गैरसमजातून त्यांच्या क्वॉरंटाईनला विरोध करु नका. डॉक्‍टरांनाच जर अशा प्रकारची वागणूक मिळत असेल तर उपचार करायचे कसे ? 

डॉक्‍टरांनाही कुटुंब आहे. तरीही ते कोरोनाच्या काळात सेवाभाव जपत असताना नागरीकांनी त्यांना सहकार्य करुन त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे. त्यामुळे याठिकाणी डॉक्‍टरांच्या क्वॉरंटाईनला विरोध करु नका अशी विनंती ज्येष्ठ डॉक्‍टरांनी केली. मात्र, नागरीक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. वाद वाढत गेला. अखेर नगरसेवक पराग पाटील यांनी यातून मार्ग काढताना स्वत:च्या हॉटेलमध्ये डॉक्‍टरांना विनामोबदला क्वॉरंटाईन करण्याचा प्रस्ताव मांडला. यानंतर डॉक्‍टर आणि नागरीकांचा वाद निवळला. पाटील यांच्या हॉटेलमध्ये सध्या डॉक्‍टरांना क्वॉरंटाईन करण्यात आले. 
 

कोरोनाच्या काळात आयएमए व जेएमएच्या वतीने वैद्यकीय सेवा दिली जात आहे. बीएमएमएस, बीएएमएसचे दररोज तीन डॉक्‍टर या कार्यात आहेत. त्यांनाही स्वत:चे कुटुंब आहे. तरीही ते हे काम करत आहेत. मग त्यांची सुरक्षा कोण पाहणार? डॉक्‍टरांच्याच क्वॉरंटाईनला विरोध होत असेल तर डॉक्‍टर हतबल होतील. त्यामुळे त्यांना समाजानेच बळ देण्याची गरज आहे. 
- डॉ. महावीर अक्कोळे, माजी नगरसेवक 


दृष्टिक्षेप 
- पॉझिटिव्ह रूग्णावर उपचार करणारा डॉक्‍टर क्वारंटाईन 
- हॉस्पीटलमध्ये डॉक्‍टरला क्वारंटाईन करण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध 
- नगरसेवकाने डॉक्‍टरला केले हॉटेलमध्ये क्वारंटाईन 


संपादन : प्रफुल्ल सुतार

कोल्हापूर

कोल्हापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com