घरातच राहून बॉडी फिटनेस ठेवायचाय तर तुम्हाला याची होईल मदत... 

सुयोग घाटगे
गुरुवार, 9 एप्रिल 2020

संचार बंदीच्या काळात फिटनेस अॅप्सची चलती... 

कोल्हापूर - कोरोनामुळे सर्वकाही बंद असताना अनेकांनी स्वतःच्या बॉडी फिटनेसकडे लक्ष देण्यास सुरवात केली आहे. या मध्ये त्यांना विविध फिटनेस अॅपचे मौलिक मार्गदर्शन लाभत आहे. या अॅप च्या साहाय्याने घरी करता येणारे विविध व्यायाम प्रकार आणि त्यांचे विविध चॅलेंजस देखील घेण्यात येत आहेत. या मुळे प्ले स्टोअर वरील हे विविध फिटनेस अॅप लोकप्रिय होत आहेत. 

यातील काही अॅप आणि त्यांची कार्यपद्धती 
 
एन.टी.सी.   

जर दररोज व्यायामाचा कंटाळा असेल तर  हे अॅप तुमच्यासाठीच आहे. या अॅपमध्ये खूप सारे व्यायामाचे व्हिडिओज असून वापरायला पण अगदी सोपे आहे. इतर अॅप्सपेक्षा हे अॅप यातल्या विविध आणि चांगल्या व्हिडिओमुळे आणि समजायला सोप्या भाषेमुळे खूप वेगळं ठरतं. यातल्या फीड सेक्शनमध्ये फिटनेसच्या बाबतीत असलेल्या बातम्याही तुम्ही वाचू शकता. तुमच्या वैयक्तिक माहितीनुसार हे अॅप तुम्हाला व्यायाम प्रकार सुचवतं.

सेव्हन मिनिट वर्कआऊट 

टाईट शेड्युल मुळे व्यायाम करता न येणाऱ्यांसाठी हे अॅप वरदान म्हणावे लागेल. यातले खूप साऱ्या व्यायाम प्रकारातून तुम्ही तुम्हाला जमेल असा व्यायाम प्रकार निवडू शकता. प्रत्येक प्रकारच्या सूचना आणि व्हिडिओज तुम्हाला या अॅपमध्ये बघायला मिळतील. अॅपच्या नावाप्रमाणे व्यायामासाठी तुम्हाला सात ते दहा मिनिटं द्यावी लागतील . फिटनेस साठी वेळ नसणाऱ्यांसाठी हे अॅप सच्चा मित्र आहे. 

आश्चर्यम् ! कोरोनावर ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा...  

माय प्लेट कॅलरी ट्रॅकर 

 फिट आणि हिट राहायचं असेल तर व्यायामाच्या जोडीला पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. काय खाता ?  किती खाता ? कधी खाता ? यावर पण तुमचा फिटनेस अवलंबून आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी समतोल आहारसुद्धा तितकाच गरजेचा आहे. हे अॅप तुमच्या पूर्ण डाएटवर लक्ष ठेवणारे अॅप आहे. तुमच्या वजनाप्रमाणे, वजन कमी करायचं असेल किंवा वाढवायचं असेल त्याप्रमाणेसुद्धा खूप सारे डाएट प्लॅन तुम्हाला हे अॅप आरामात सुचवतं. 

इंटरव्हल टाइमर

कुठलाही व्यायाम करताना ब्रेक घेणं हेही महत्त्वाचं आहे. जर ब्रेक जास्त वेळ घेतला तर तंदुरुस्त कसं राहणार आणि जर कमी वेळ घेतला तर तुमच्या शरीरावर अतिरिक्त ताण येणार, याचा विचार होणं गरजेचं आहे. यावरचा उपाय म्हणजे इंटरव्हल टाइमर हे अॅप होय. यात व्यायाम, जेवण किंवा इतर अॅप्सप्रमाणे डाएट प्लॅन नाही, पण एक टाइमर आहे. तो तुमच्या व्यायामावर नजर ठेवतो आणि तो वेळोवेळी तुम्हाला सावध करतो.

माय फिटनेस पल

हे अॅप जास्तीत जास्त फिटनेस तज्ज्ञांनी सुचवलेलं अॅप आहे. त्याला कारणही आहे. फिट राहण्यासाठी जी काही माहिती लागते ती बहुतेक सर्व या अॅपवर देण्यात आली आहे. तुम्ही एकदा या अॅपमध्ये लॉग इन केल्यानंतर हे अॅप तुमच्या वैयक्तिक माहितीच्या आधारे तुम्हाला किती कॅलरी लागेल हे सुचवतं. यात असलेल्या प्रोग्रेस टॅबमध्ये तुमची दैनंदिन प्रगती तुम्ही सहज पाहू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online apps for body fitness