कोल्हापुरात फक्त एवढ्याच रुग्णालयांत आहे महात्मा फुले योजना  

Only 15 hospitals in Kolhapur have Mahatma Phule Yojana
Only 15 hospitals in Kolhapur have Mahatma Phule Yojana

कोल्हापूर - ज्या खासगी रुग्णालयाला यापूर्वी महात्मा जोतिबा फुले योजनेतून निलंबित केले आहे, तेथील रुग्णांना योजना लागू असणार नाही. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे शहरातील २२ खासगी रुग्णालयांनी योजनेची मागणी केली होती. त्याला मंजुरीही दिली होती. तांत्रिक पातळीवर शासनाकडून अद्यापही रुग्णालयाला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे शहरात केवळ १५ च खासगी हॉस्पिटलमध्ये योजनेतून मोफत उपचार देता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी देसाई यांनी आज सायंकाळी दिली. कोरोना रुग्णांवर उपचार घेऊन योजनेप्रमाणेच बिल घेणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले, जिल्ह्यात एकूण ४७ खासगी रुग्णालयांत महात्मा जोतिबा फुले योजना सुरू आहे. तेथे कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. अशा हॉस्पिटलमध्ये ८० टक्के बेड हे कोविड-१९ साठी तर २० टक्के बेड इतर रुग्णांसाठी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या रुग्णालयात योजना लागू आहे तेथे सरकारी दरातच उपचार झाले पाहिजेत. तेही रुग्णांसाठी मोफत असणार आहेत. 

इंजेक्‍शनचा साठा
कोरोना रुग्णांसाठी रेमेडिलिव्हियर इंजेक्‍शन महत्त्वाचे आहे. सध्या दीड हजार इंजेक्‍शनचा साठा ‘सीपीआर’मध्ये आहे. गरजेनुसार वापर केला जाईल. ज्यांना आवश्‍यक आहे त्यांनाच इंजेक्‍शन दिले जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.


अँटिजेन टेस्टची सोय
अँटिजेन रॅपिड टेस्टमुळे कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही, हे कळते. त्यामुळे स्वॅब घेण्यापूर्वी ही चाचणी केली जाणार आहे. जिल्ह्यात १५ ठिकाणी ही चाचणी होईल. करवीर तालुक्‍यात केआयटी महाविद्यालय, आयसोलेशन, सीपीआर, डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये ही चाचणी उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळी यांनी दिली.


संपादन - धनाजी सुर्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com