गडहिंग्लजला अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश 

Order To Continue Essential Services To Gadhinglaj Kolhapur Marathi News
Order To Continue Essential Services To Gadhinglaj Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : तीन दिवसाच्या लॉकडाऊननंतर आज गडहिंग्लजला भाजी व किराणा माल खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली. कोरोनाला रोखण्यासाठी आवश्‍यक सामाजिक अंतर गर्दीत न पाळल्याने गडहिंग्लजच्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्‍यक सेवा सुरूच ठेवण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत, अशी माहिती तहसीलदार दिनेश पारगे यांनी दिली. 

गडहिंग्लजला पालिकेने तीन दिवस लॉकडाऊन केला होता. त्या कालावधीत भाजी व किराणा मालाचीही दुकाने बंद केले होते. तीन दिवसाचा लॉकडाऊनचा कालावधी संपल्याने आज सायंकाळी चार ते आठपर्यंत भाजी व किराणा खरेदीसाठी मुभा दिली होती. त्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. सोशल डिस्टनिंग पाळले गेले नाही. आठवडा बाजाराचे स्वरूप आज शहराला आले होते. गर्दीला नियंत्रीत करण्यासाठी दोन तासानंतर प्रशासनाला संपूर्ण किराणा मालाची दुकाने व भाजी विक्री बंद करावी लागली. त्यानंतर गर्दी हटली. 

लॉकडाऊनमध्ये अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश शासनाचे आहेत. आजच्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर तहसीलदार पारगे यांनी पालिकेला सूचना केली आहे. कोरोना विषाणूला हरवण्यासाठी गर्दी टाळणे महत्वाचे आहे. परंतु, तीन दिवस बंदमुळे आज अचानक नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर उतरले. अशा प्रकारामुळे शासनाचा हेतू साध्य होणार नसल्याचे सांगून पालिकेने लॉकडाऊन केले असले तरी किराणा माल, भाजीपाला, मेडीकल, दूध विक्री आदी अत्यावश्‍यक सेवा सुरूच ठेवण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com