बाहेरून आलेल्यांना क्वारंटाईन नाही, होम क्वारंटाईन 

Outsiders have no quarantine, no home quarantine
Outsiders have no quarantine, no home quarantine

कोल्हापूर :  शहराला लागूनच असलेल्या शिंगणापूर (ता. करवीर) ग्रामपंचायतीने कोरोना विरोधात लढण्यासाठी सर्व ती तयारी केली आहे. गावातील हायस्कूलमध्ये कोवीड काळजी केंद्र सुरुही केले आहे. मात्र, आजपर्यंत त्याचा वापर करण्यात आलेला नाही. किरकोळ लक्षणे असणाऱ्या तसेच रेड झोनमधून आलेल्या 70 हून अधिक व्यक्‍तींना होम क्‍वारंटाईन करण्यात आले आहे. गावात नियमितपणे औषध फवारणी सुरु आहे. 

मार्चपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश झाला. सुरुवातीस शहरी भागात व नंतर ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार सुरु झाला, तो आजपर्यंत कायम आहे. उलट दररोज ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. जिल्ह्याबाहेरुन गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्‍तीची नोंद घेवून त्यांना घरात तसेच संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार शिंगणापूर ग्रामपंचायतीनेही जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या लोकांना होम क्‍वारंटाईन केले आहे. आतापर्यंत जिल्ह्याबाहेरुन आलेल्या लोकांची संख्या 70 हून अधिक झाली आहे. या सर्वांना घरातच अलगीकरण केले आहे. 

होम क्‍वारंटाईनसह 50 वर्षांवरील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या औषधांचा पुरवठा करण्यात आला असून गावात सतत औषध फवारणी सुरु आहे. गावातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये संस्थात्मक अलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अजुनही याचा वापर झालेला नाही. 

गावात कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव नाही. जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या सर्व लोकांना होम क्‍वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचा कालावधीही आता पूर्ण होत आहे. गावात सातत्याने औषध फवारणी व सर्वेक्षण सुरु आहे. 
- गायत्री जाखलेकर, ग्रामसेवक शिंगणापूर. 


दृष्टिक्षेप 
- मार्चपासून जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण 
- जिल्ह्याबाहेरून आल्या 70 हून अधिक व्यक्‍ती 
- जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईनची व्यवस्था, मात्र अद्याप वापर नाही 
- गावात सतत औषध फवारणी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com