esakal | रुकडीत साकारतोय ऑक्‍सीजन पार्क 

बोलून बातमी शोधा

Oxygen Park Is Being Built In Rukdi Kolhapur Marathi News}

आधार फाउंडेशनने रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सुमारे दोन हेक्‍टर जागेमध्ये विविध प्रकारची झाडे लावून ऑक्‍सीजन पार्कची निर्मिती केली आहे.

रुकडीत साकारतोय ऑक्‍सीजन पार्क 
sakal_logo
By
सागर कुंभार

रुकडी : येथील आधार फाउंडेशनने रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सुमारे दोन हेक्‍टर जागेमध्ये विविध प्रकारची झाडे लावून ऑक्‍सीजन पार्कची निर्मिती केली आहे. आधारचे सदस्य दोन वर्षे हे कार्य करत आहेत. यासाठी लोकवर्गणीमधून सुमारे अडीच लाख रुपये खर्च आतापर्यंत केला आहे. 

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे आणि त्याचे संवर्धन करणे हा एकमेव पर्याय असल्याने वृक्षारोपणाच्या कार्याला प्राधान्य दिले आहे. यासाठी दहा वर्षात सुमारे सहा हजार वृक्षांची लागवड केली असून त्यातील 80 टक्के वृक्ष चांगल्या पद्धतीने वाढलेले आहेत. गावातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावली आणि त्यातूनच ऑक्‍सीजन पार्कची निर्मिती करायची ही संकल्पना पुढे आली. रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने रुकडी रेल्वे स्टेशनच्या समोरील बाजूस रयत शिक्षण संस्थेच्या परिसरात लागून असलेल्या जागेत हा ऑक्‍सीजन पार्क साकारत आहे.

यामध्ये वड, पिंपळ, बहावा,सिसम, भोकर, हिरडा, बेहडा, कुंकूफळ,रूद्राक्ष,करंज,रीठा,बकुळ,अशोक,सिताफळ, सिताअशोक,कळंब,गुळभेंडी,कडुलिंब,चिंच,अर्जुन, आवळा,महारूख,पांढरी सावर,मोहगणी,कदंबा,वारस, बेल,कवठ,जांभुळ,फणस,पेरू,आंबा,सोनचाफा,मोरआवळा, नारळ अशी पन्नास प्रकारची देशी,औषधी आणि फळझाडे लावली आहेत. परीसराचे सौंदर्य वाढत असून या परीसरात फिरायला येणा-या ग्रामस्थांची संख्या वाढत आहे. 

विविध संस्थांचे सहकार्य
वाढदिवसानिमीत्त तसेच काहिंनी विवाहाच्या खर्चाला फाटा देऊन तोच पैसा वृक्षारोपणासाठी दिला आहे. वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी आधार फौंडेशनला पाण्याचा टॅंकर, डिझेल इंजिन आणि ठिबक पाईप देऊन सहकार्य केले आहे. ऑक्‍सीजन पार्कसाठी विविध सामाजिक, शैक्षणिक व दानशूर व्यक्तींनी आर्थिक सहकार्य केल्याने ही संकल्पपूर्ती होत आहे. 
- संदिप बनकर, संस्थापक अध्यक्ष आधार फौंडेशन 

संपादन - सचिन चराटी

kolhapur