आजऱ्यात भटक्‍या कुत्र्यांची दहशत

Panic Of Stray Dogs In Ajara Kolhapur Marathi News
Panic Of Stray Dogs In Ajara Kolhapur Marathi News

आजरा : आजरा शहरात गेले दोन महिन्यापासून सार्वजनिक ठिकाणी रस्ते, बसस्थानक व कधी-कधी गल्लीमध्ये भटक्‍या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. हा वावर धोकादायक ठरतो की, काय असे वातावरण काल शनिवार (ता. 18) शहरात घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे. एका पिसाळलेल्या भटक्‍या कुत्र्यांने तब्बल 19 नागरीकांवर हल्ला करून जखमी केले. या घटनेने शहरात भितीचे वातावरण आहे. 

या भटक्‍या कुत्र्यांपासून लहान मुले ते ज्येष्ठ नागरीक यांना भविष्यात धोका आहे. अशा कुत्र्यांचा नगरपंचायत प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरातील नागरीकांतून होत आहे. दिवसभरात पिसाळलेल्या कुत्र्यांने शहरात नवरात्रौत्सवाच्या खरेदीसाठी व शासकीय कामांसाठी आलेल्या खेडोपाड्यातील नागरिकांना कुत्र्यांनी जखमी केले. त्याचबरोबर शहरातील गल्ल्यांमध्ये दहशत निर्माण केली आहे. जखमींनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले, तर काही गंभीर जखमीना उपजिल्हा रुग्णालाय गडहिंग्लजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

या भटक्‍या कुत्र्यांच्या टोळक्‍यात पंधरा वीस कुत्री आहेत. ही कुत्री कधी- कधी रस्त्यावर पहुडलेली असतात. रहदारीलाही अडथळा ठरतात. यांची संख्या जास्त असल्याने ती कधी अंगावर येतील म्हणून त्यांना कोणी हाकलण्याचा प्रयत्न करीत नाहीत. कोणी तसा प्रयत्न केला, तर त्याच्या अंगावर धावून गेल्याचे प्रकार घटले आहेत. अंधारात शहरातील रस्त्यावर त्यांचा वावर अधिक धोकादायक ठरत आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करावा, अशी मागणी आहे. शहरात एका कुत्र्यांने केलेल्या हल्ल्याचा विचार करून नगरपंचायत प्रशासनाने पावले उचलावीत, अशी प्रतिक्रिया नागरीकांतून उमटत आहे. 

पहाटे फिरणेही ठरते धोकादायक 
कुत्र्याच्या भितीने शहरातील काही नागरीकांनी पहाटे रस्त्यावर फिरणे बंद केले आहे, तर काही नागरीक हातात टोणका, काठी घेवून फिरायला बाहेर पडत आहे. मोकळ्या हवेत फिरतांना जीव मुठीत घेवून जावे लागत असल्याचे शहरातील नागरीक सांगतात. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com