इचलकरंजीत नऊ महिन्यांनी पासची खिडकी ओपन

The Pass Window Opens In Ichalkaranji After Nine Months Kolhapur Marathi News
The Pass Window Opens In Ichalkaranji After Nine Months Kolhapur Marathi News

इचलकरंजी : शाळा, कॉलेज सुरू झाल्याने एसटी पास योजनेची खिडकी आता इचलकरंजीत ओपन झाली आहे. शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी तत्काळ एसटी आगाराने पासची सोय उपलब्ध केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी सवलतीच्या पासची खिडकी तब्बल नऊ महिन्यांनी उघडली आहे. पूर्ण क्षमतेने शाळा सुरू झाल्यानंतर पाससाठी विद्यार्थ्यांचा अधिक प्रतिसाद लाभेल. दरम्यान, सवलतीच्या पाससाठी आगाराकडून सर्व शाळांनाही आवाहन केले जात आहे. 

विविध खेड्यांपाड्यातून इचलकरंजीत शिकण्यास येणारा प्रत्येक विद्यार्थी शाळा सुरू झाली की प्रथम एसटी पासची खिडकी गाठतो. सवलत देणारी एसटीची प्रवासी पास योजना विद्यार्थ्यांसाठी आधार असते. शासनाने पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीच्या वर्ग सुरू केले. मात्र प्रतिसाद कमी असल्याने ग्रामीण भागात एसटीची पूर्तता आगाराकडून होत नव्हती. ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या होत नसल्याने विद्यार्थ्यांसाठी सवलतीची पास योजनाही ताटकळत पडली.

शहरातील पाचवीपासून आठवीपर्यंतच्या शाळा आता सुरू होत आहेत. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थी शहरात येत आहेत. ग्रामीण भागात आगाराकडून बसच्या फेऱ्या वाढवल्या जात आहेत. शाळा सुरू होण्याच्या हालचालींचा वेग पाहता एसटी आगाराने पाससाठी खिडकी उघडली. 

शहरातील मुख्य बस स्थानकावरील पासची खिडकी उघडण्यात आली आहे. मात्र राजवाड्यावरील खिडकी बंद आहे. विद्यार्थी प्रतिसाद वाढल्यानंतर येत्या काही दिवसात राजवाड्यावरील पासची खिडकी विद्यार्थ्यांच्या सेवेत असणार आहे. 

होळकर पास योजनेला प्रतिसाद 
गतवर्षी शहरातील दहा शाळा-कॉलेजातील एकूण 706 मुलींनी अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेचा लाभ घेतला होता. या वर्षी ही पास योजना सुरू होताच अनेक शाळांनी अहिल्याबाई होळकर पास योजनेसाठी आगाराकडे धाव घेत आहेत. प्रत्येक शाळा ग्रामीण भागातील मुलींची यादी करून अगारातून मोफत पासची मागणी करत आहेत. 

एसटीचा ताळमेळ बसेना 
शाळा, कॉलेज सुरू झाल्याने ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या वाढवल्या जात आहेत. मात्र शाळा, कॉलेज दोन सत्रात सुरू असल्याने एसटीला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी भासत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आगारातून एसटीचा ताळमेळ बसत नसल्याचा दिसून येत आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com