कोल्हापुरात पासपोर्ट कार्यालय मंगळवारपासून सुरू

 Passport office in Kolhapur starts from Tuesday
Passport office in Kolhapur starts from Tuesday

कोल्हापूर,ः कोरोना संकटामुळे एप्रिल महिन्यापासून पासपोर्ट (पारपत्र) कॅम्प बंद होता. तो 1 डिसेंबर पासून रमणमळा येथील कार्यालयात सुरू होणार आहे. 
कोरोना संकटामुळे लॉकडाउन झाला. तसे आपोआपच परदेशात जाणाऱ्यांची संख्याही बंद झाली. त्यामुळे कोल्हापुरातील पासपोर्ट कॅम्प एप्रिल महिन्यापासून बंद ठेवण्यात आला होता. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात सुमारे सात हजार पासपोर्टच्या कामाची पूर्तता झाली होती. पण लॉकडाऊनमुळे पुढील प्रक्रिया बंद झाली. ज्यांना उपचार, शिक्षण व अन्य कारणासाठी तातडीने परदेशात जावे लागणार होते. त्यांना पुण्यातील कार्यालयात पासपोर्ट काढण्यासाठी जावे लागत होते. लॉकडाऊन जसजसा शिथिल होत गेला तस तशी परदेशात जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली. बंद झालेले पासपोर्ट कार्यालय पुन्हा सुरू व्हावे, अशी मागणी जोर धरू लागली. अखेर या मागणीचा विचार करून 1 डिसेंबर पासून त्याची सुरवात होत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

दररोज 50 मुलाखती... 
तब्बल नऊ महिन्याच्या प्रतिक्षेनंतर 1 डिसेंबरपासून रमणमळा येथील पासपोर्ट कार्यालय सुरु होणार आहे. दररोज 50 तर इचलकरंजी येथे ही 25 जणांच्या मुलाखती होतील. मुलाखतीला येण्यापुर्वी ऑनलाईन अपॉईंन्टमेंट घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कार्यालयात मास्क, सॅनिटायजरचा वापरही करावा लागणार आहे.  

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com