कराच्या बोजाने  पेट्रोल, गॅस पेटले ; दोन वर्षातील उच्चांक 

petrol gas price increase december 2020
petrol gas price increase december 2020

कोल्हापूर : घरगुती गॅस सिलिंडर आणि पेट्रोलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. इंधनाच्या मुख्य किमतीपेक्षा कराचा बोजाच जास्त झाल्यामुळे दरवाढ झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनात येत आहे.

सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दराने मागील दोन वर्षांतील उचांकी पातळी गाठत पेट्रोलने 90 पार केली आहे. तर विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये 77 रुपयांची वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझलचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. 1 जून पासून दरवाढीस पुन्हा सुरवात झाली; मात्र 22 सप्टेंबरपासून पुन्हा दरवाढीवर रोख लावली होती. मागील 17 दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये 2.35 रुपयांनी तर डिझेलचे 3.15 रुपयांनी वाढ झाली आहे. उत्पादन शुल्कातील वाढीचा परिणामदेखील इंधनाच्या दरावर झाला आहे. केंद्राकडून पेट्रोलवर 32.98 रुपये तर डिझेलवर 31.83 रुपये उत्पादन शुल्क तर राज्य सरकारकडून पेट्रोलवर 26 टक्के आणि डिझेलवर 24 टक्के व्हॅट तर पेट्रोलवर 10.20 रुपये डिझेलवर 3 रुपयांचा सेस देखील आकाराला जातो. कोल्हापूरमध्ये सोमवारी पेट्रोल दर 90.26 रुपये तर डिझेलचा दर 79.29 रुपये आहे. विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचा दर 716.50 रुपये झाला आहे. 

 
 
संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com