गाडीवरून फिरणे त्यांना चांगलेच पडले महागात 

police action two wheeler kolhapur
police action two wheeler kolhapur

कोल्हापूर : पोलिस परेड मैदानाच्या आवारात किमान अडीच ते तीन हजार दुचाकी वाहने तात्पुरत्या जप्त अवस्थेत आहेत. लॉकडाऊन म्हणजे, संचारबंदीच्या काळात जे घराबाहेर पडले व पोलिस कारवाईत सापडले अशांची ही वाहने आहेत. ही वाहने आता लॉकडाऊन उठल्यानंतरच परत त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत, मात्र त्या वाहनांची सर्व कागदपत्रे तत्पूर्वी सादर करावी लागणार आहेत. 

संचारबंदीत फिरले, की पोलिसांच्या काठीचा फटका असे सगळीकडे चित्र आहे; पण कोल्हापुरात काठीच्या फटक्‍यापेक्षा मोठा फटका संचारबंदीत फिरणाऱ्या वाहनचालकांना या कारवाईत बसला आहे. 15 दिवस त्यांची वाहने पोलिसांच्या ताब्यात तर आहेतच; पण आता वाहन सोडवून घेऊन जाताना सर्व कागदपत्रांची पूर्तता व त्याशिवाय वेगळी दंडात्मक स्वरूपाची कारवाई ही असणार आहे. 

संचारबंदीत घराबाहेरही पडायचे नाही, हे स्पष्ट आहे; पण तरीही आपल्याला काय होतेय आणि आपल्याला कोण काय करतंय? अशीच अनेकांची भावना आहे. त्यामुळे ते बिनधास्त फिरतात. फिरताना पोलिसांनी अडवले तर काही तरी कारण सांगण्यासाठी त्यांनी खिशात औषधांच्या जुन्या चिठ्ठ्या ठेवल्या आहेत; पण पोलिसांनी या "आयडिया' ओळखून थेट कारवाईलाच प्रारंभ केला आहे. आतापर्यंत शहरात 1150, करवीर तालुक्‍यात 300, जिल्ह्यात 700 ते 800 दुचाकी वाहने ताब्यात घेतली आहेत. त्यात काही चार चाकी वाहने व रिक्षाचाही समावेश आहे. 

या कारवाईअंतर्गत पोलिस चौकात थांबतात. येईल ते वाहन अडवितात. अगदी तातडीचे कारण असल्यास ते वाहन सोडतात. काठीचे फटके मारत नाहीत. शिवीगाळ करत नाहीत. शांतपणे वाहन उचलतात व ट्रेनमध्ये ठेवून पोलिस परेड मैदानावर नेतात. तेथे या वाहनाच्या सुरक्षिततेसाठी पोलिस नेमले आहेत. ज्यांचे वाहन पकडले आहे, ते वाट्टेल तेवढा दंड भरून वाहन नेण्यास तयार आहेत; पण पोलिसांनी लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरच वाहने ताब्यात घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे वाहनमालक हडबडले आहेत. कागदपत्रे हा अनेकांच्या अडचणीचा मुद्दा आहे. 


संचारबंदीत वाहनांवरून फिरणाऱ्यांना मारण्यापेक्षा वाहन ताब्यात घेण्याची कायदेशीर कारवाई प्रभावी आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या सूचनेप्रमाणे केलेली ही कारवाई परिणामकारक ठरली आहे. वाहन लॉकडाऊन संपल्यानंतर की अगोदर परत द्यायचे, हे ठरविले जाईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com