'त्या' तोतया पोलिस उपनिरीक्षक तरुणीसह मामाला कोठडी 

police custody for duplicate young police sub inspector
police custody for duplicate young police sub inspector

कोल्हापूर - : पोलिस खात्यात नोकरी लावतो म्हणून युवक-युवतींना लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी संशयित तोतया सीआयडी इन्स्पेक्‍टर प्रियांका चव्हाण आणि तिचा मामा विठ्ठल निलवर्ण यांना भुदरगड पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

पोलिसांनी सांगितले की, तोतया सीआयडी इन्स्पेक्‍टर असल्याची खोटी बतावणी करून रूबाब मारणाऱ्या गारगोटीतील प्रियांका चव्हाण व तिचा मामा विठ्ठल निलवर्ण याने पोलिस खात्यात नोकरी लावतो अशी भूलथाप देऊन निळपण येथील प्रतिक्षा साळवी हिच्याकडून 5 लाख 25 हजार, प्रज्ञा प्रमोद मेंगाणे हिच्याकडून 1 लाख 50 हजार तर मंगेश आनंदा चौगले याच्याकडून 2 लाख 50 हजार रुपये असे सुमारे 9 लाख 25 हजार रुपये घेतले होते. प्रतिक्षाला सीआयडी कॉन्स्टेबल, प्रज्ञाला सीआयडी कारकून अशी बनावट ओळखपत्र व नियुक्ती पत्र देऊन फसवणूक केली आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रियांका चव्हाण व तिचा मामा विठ्ठल निलवर्ण यास पोलिसांनी आज न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

 दरम्यान, याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाचे विभागीय पोलिस अधिकारी ज्योती आमने यांनी भुदरगड पोलिस ठाण्याला भेट दिली. प्रियांका व विठ्ठल याला बंद खोलीत घेऊन तपासासाठी आवश्‍यक चौकशी केली. तसेच प्रियांकाच्या आई-वडिलांनाही तपासासाठी पोलिस ठाण्यात बोलावून घेतले होते. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com