...त्यामुळे आहे कोल्हापुरातील पंचगंगा घाटावर बंदोबस्त 

Police guard on kolhapur panchganga ghat
Police guard on kolhapur panchganga ghat

कोल्हापूर - आषाढाला प्रारंभ झाला असला तरी यंदाच्या त्र्यंबोली यात्रेवर कोरोनाचे सावट राहणार आहे. समूह संसर्गाचा धोका वाढू लागला असल्याने पंचगंगा घाटावर होणाऱ्या परडी व इतर धार्मिक विधींसाठीही गर्दीवर नियंत्रण  ठेवावे लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पंचगंगा घाटावर बंदोबस्त ठेवण्यात आला असून गर्दीबरोबरच नदीत नैवेद्य व पूजा साहित्य न टाकण्याबाबत प्रबोधन केले जावू लागले आहे. दरम्यान, महापालिका अग्निशमन दलासह आरोग्य विभागाचे कर्मचारीही येथे कार्यरत आहेत.  

लॉकडाउनच्या काळात प्रदूषणाचे प्रमाण कमी होऊन पंचगंगा नदीचे पाणी नितळ झाले. त्यानंतर महापालिकेने नदीत प्रदूषण करणाऱ्यांवर प्रत्यक्ष घाटावर जाऊन कारवाई केली.

लॉकडाउनच्या काळात पंचगंगा स्मशानभूमीत मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत रक्षाविसर्जन होऊ लागले. त्याशिवाय केवळ कमीत कमी पदार्थ असणारा एकच नैवेद्य ठेवण्याचा नवा पायंडा सुरू झाला. त्यामुळे अन्नाची नासाडी कमी होऊ लागली. त्यामुळे एकच नैवेद्याच्या संकल्पनेलाही कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर आषाढातील यात्रांच्या निमित्ताने पुन्हा नदीचे प्रदूषण होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मोजक्‍याच लोकांनी परंपरेप्रमाणे येथे विविध धार्मिक विधी जरूर करावेत. मात्र, निर्माल्य व इतर साहित्य पाण्यात बुडवून ते नदीबाहेर एकाच ठिकाणी ठेवावे, असे आवाहन येथे केले जावू लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com