कोल्हापुरात महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा

Police raid women's gambling den in Kolhapur
Police raid women's gambling den in Kolhapur

कोल्हापूर - राजेंद्रनगर येथील महिलांच्या जुगार अड्ड्यावर राजारामपुरी पोलिसांनी काल छापा टाकला. अड्ड्यातील सहा महिलांसह नऊ जणांवर कारवाई केली. त्या सर्वांकडून सुमारे २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. गेल्या महिन्याभरात अशा प्रकारची ही दुसरी कारवाई ठरली.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे - सुनील संभाजी जाधव (रा. टेंबलाई नाका), योगेश दगडू भांगरे, संतोष कमलाकर गायकवाड (दोघे रा. सुधाकर जोशीनगर), भिंगरी अविनाश सकट (रा. राजेंद्रनगर), सुरेखा रामू नरंदे (रा. टेंबलाईनाका), हेमा रवींद्र कसबेकर (रा. राजारामपुरी १४ वी गल्ली), लता राजेश उपाळे, लक्ष्मी हिराचंद्र राख (दोघे रा. संभाजीनगर परिसर), पिंकी विशाल सकट (रा. राजेंद्रनगर) अशी आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, राजेंद्रनगर येथील पत्र्याच्या शेडमध्ये महिलांचा जुगार अड्डा सुरू आहे. अशी माहिती राजारामपुरी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक अभिजित गुरव यांना मिळाली. त्यांनी मध्यरात्री या अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी तेथे सहा महिलांसह नऊ जण पत्तांचा अंदरबाहर जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील १८ हजार ४४० रुपयांची रोकडसह मोबाईल संच असा एकूण २० हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या अड्ड्याची मालकीण संशयित सुरेखा नरंदे असल्याची माहिती पुढे 
आली आहे.

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com