"पॉलिटेक्‍निक'च्या परीक्षांचा निर्णय14 एप्रिलनंतरच

"Polytechnic" exam  Declaration After April 14th Kolhapur Marathi News
"Polytechnic" exam Declaration After April 14th Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : दहावी व विद्यापीठाच्या परीक्षांबाबत काही निर्णय जाहीर झाले आहेत. तंत्रनिकेतन (पॉलिटेक्‍निक) परीक्षांबाबत अद्याप तंत्रशिक्षण मंडळाने निर्णय जाहीर केलेला नाही. 14 एप्रिलनंतर शैक्षणिक कामकाज सुरळीत झाल्यावरच याबाबतची घोषणा केली जाण्याची शक्‍यता मंडळाने परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. संस्थांना आणि शिक्षकांना ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत. परीक्षेबाबत विद्यार्थी आणि पालकांना हुरहूर लागून राहिली आहे. राज्यात 359 पॉलिटेक्‍निकमध्ये सुमारे दीड लाख विद्यार्थी आहेत. 

पॉलिटेक्‍निक शैक्षणिक वर्ष अंतिम टप्प्यात आले होते. सत्राचा समारोप आणि चाचणी परीक्षा शिल्लक राहिल्या होत्या. त्यानंतर प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा होणार होती; परंतु शासनाने कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन 16 मार्चपासून सर्वच पॉलिटेक्‍निक संस्थांचे शैक्षणिक कामकाज थांबविण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली. आठवडाभर कसेतरी 50 आणि त्यानंतर 25 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती संस्थांत ठेवली. त्यानंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्याने परीक्षा लांबणीवर पडल्या. शिक्षकांनी विषयनिहाय आढावा घेऊन ऑनलाईन तास आणि मॅन्युअल इत्यादींचा वापर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे आहे.

याबाबतचे सर्व विषयांचे ऑनलाईन मॅन्युअल महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने उपलब्ध केले आहेत. उर्वरित चाचणी परीक्षा आणि त्यानंतर प्रात्यक्षिक की लेखी परीक्षा, याबाबत विद्यार्थी आणि पालकांत प्रतीक्षा लागून राहिली आहे. 

वेळापत्रक संकेतस्थळावर 
शिक्षकांनी वर्क फॉम होमद्वारे व्हॉटस्‌ ऍप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक अध्ययनासाठी मदत करण्याची सूचना केली आहे. शैक्षणिक संस्था पूर्ववत कार्यान्वित झाल्यावर मंडळातर्फे परीक्षांचे सुधारित वेळापत्रक मंडळाच्या www.msbte.org.in या संकेतस्थळावर जाहीर करणार असल्याचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com