धामोडमध्ये एक पॉझिटिव्ह ; 28 जण क्वारंटाईन 

A positive in Dhamod; 28 quarantine
A positive in Dhamod; 28 quarantine

धामोड : येथे सुतार गल्लीतील 55 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कात आलेल्या 21 जणांना आज राधानगरी कोवीड सेंटरमध्ये स्वॅबसाठी पाठवले आहे. दरम्यान गाव सील केले असून सुतार गल्ली परिसर प्रतिबंधित क्षेत्र केला आहे. येथील बाजारपेठ आठवडाभर बंद राहील. 

आठवड्यापासून येथील बाधित व्यक्तीला ताप येत होता. सुरुवातीला भोगावती येथील खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घेतले. तीन दिवस तेथे उपचार घेऊनदेखील ताप न कमी आल्याने कोल्हापुरातील डॉ. डी वाय पाटील रुग्णालयामध्ये गेले होते. त्याचा आज सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कात येथील 21 जण आले आहेत. आज राधानगरी येथील कोवीड सेंटरमध्ये त्यांचा स्वॅब घेऊन अलगीकरण करण्यात केले.

दरम्यान ग्रामपंचायतीने गाव आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येथील बाजारपेठही बंद केली असून बाधित सुतार गल्ली प्रतिबंधक क्षेत्र घोषित केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने घरोघरी आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी सेविका तपासणी करीत आहेत. ग्रामपंचायतीने औषध फवारणी केली आहे. दरम्यान, येथील 21 जण व संपर्कातील 7 जण स्वतःहून राधानगरी कोविड सेंटरमध्ये हजर झाले. तेथे त्यांचे स्वॅब घेण्यात आले असून अलगीकरण करण्यात आले आहे. मात्र, येथील आरोग्य यंत्रणेकडून अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसत आहे. 

संसर्ग झाला कोठून ? 
बाधित रुग्णाला कोठे संसर्ग झाला याबाबतचे नेमके कारण गुलदसत्त्यात आहे. संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकाकडून की भोगावती येथील खासगी दवाखान्यात याबाबत अनिश्‍चितता व्यक्त होत आहे. भोगावती येथील दवाखाना सील केला आहे. 

दृष्टिक्षेप 
- 21 जणांना कोवीड सेंटरमध्ये स्वॅबसाठी पाठवले 
- सुतार गल्ली परिसर प्रतिबंधित क्षेत्र 
- गाव आठवडाभर बंद 
- आरोग्य केंद्राच्या वतीने घरोघरीतपासणी 


संपादन : प्रफुल्ल सुतार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com