esakal | "आता काँग्रेसवर टीका करणारेच उद्या काँग्रेस पक्षात येतील"
sakal

बोलून बातमी शोधा

Pradesh Congress Working President MLA Satish Jarkiholi criticize to Deputy Chief Minister Laxman Savadi

आमदार जारकीहोळी; उपमुख्यमंत्री सवदींच्या टीकेला प्रत्युत्तर

"आता काँग्रेसवर टीका करणारेच उद्या काँग्रेस पक्षात येतील"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : राज्यातील विधानसभा निवडणुकीला अद्यापही अडीच वर्षे बाकी आहेत. तोपर्यंत देशात आणि राज्यात अनेक बदल होतील. आता काँग्रेसवर टीका करणारेच उद्या काँग्रेस पक्षात येतील, असा टोला प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना अप्रत्यतक्षपणे लगावला.


उपमुख्यमंत्री सवदी यांनी राज्यातील काँग्रेसवर केलेल्या टीकेला आमदार जारकीहोळी यांनी शनिवारी (ता. ७) प्रत्युत्तर दिले. राज्यात काँग्रेसमध्ये फूट पडली असून पक्ष अधोगतीला लागला असल्याची टीका उपमुख्यमंत्री सवदी यांनी केली होती. यावर आमदार जारकीहोळी म्हणाले, ‘‘पक्ष म्हटला की मतभेद, गटबाजी असायचीच. यात नवे असे काहीच नाही. भाजपध्येही तीन गट आहेत. एक दिल्लीमध्ये तर दोन गट राज्यात आहेत. काँग्रेस पक्षात नेते म्हणवून घेणारे अनेक आहेत.

हेही वाचा- यंदाची दिवाळी ‘स्वनिधी’विनाच; फेरीवाल्यांना कर्ज देण्यास बॅंकांची टाळाटाळ -

मात्र पक्षकार्यावेळी सर्वजण एकत्र येऊन कार्य करीत असतात.’’
शिरा व आर. आर. नगर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचाच विजय होईल. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही शेतकऱ्यांची आहे. राजकीय पक्षाच्या नावावरून उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. जिल्ह्यात नवे काहीतरी घडवून आणण्याची धडपड ते करीत असून त्यांना नवे काही करणे शक्‍य होणार नाही. आगामी विधानसभा निवडणूक हे आपले लक्ष्य असल्याचे भाजप म्हणत आहे. जिल्ह्यातील सर्व जागा मिळविण्याचे स्वप्नही भाजप पाहात आहे, पण, निवडणुकीपूर्वी राज्यासह देशातही अनेक बदल घडतील. त्यामुळे भाजपची स्वप्ने धुळीला मिळतील, असा टोलाही आमदार जारकीहोळी 
यांनी लगावला.

संपादन - अर्चना बनगे