आमच्या मतांवर निवडून आला आणि आम्हालाच बेघर करायला निघाला

Press conference of lakshman mane
Press conference of lakshman mane

कोल्हापूर ः आमच्या मतावर भाजप सरकार निवडून आले. सत्ता स्थापन केली. त्यानंतर आमचे नागरिकत्व नाकारत आहेत. आम्हाला संविधानाने नागरिकत्व बहाल केले आहे. ते काढून घेण्याचा अधिकार सत्ताधारी भाजपला नाही. त्यामुळे "एनपीआर', "सीएए' आणि "एनआरसी'ला भटक्‍या व विमुक्तांचा विरोधच राहील, त्यासाठी राज्यभर भटक्‍या विमुक्तांची जनजागृती सुरू असून 12 एप्रिलला बारामतीत महामेळावा घेऊन विरोध करू, अशी माहिती माजी आमदार "उपरा'कार डॉ. लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.


श्री. माने म्हणाले, ""केंद्र सरकारने आणलेल्या एनपीआर, सीएए व एनआरसीला तिन्ही कायद्याद्वारे घटनेने दिलेले अधिकार नाकारले आहेत. राज्यात अडीच कोटी भटके-विमुक्त आहेत. त्यापैकी बहुतेक जण 1950 पूर्वीचा जन्म-मृत्यूचा दाखला किंवा स्थावर जंगम मालमत्ताचा पुरावा देऊ शकत नाहीत. असा दाखला किंवा पुरावा नसेल अशा व्यक्‍ती नव्या कायद्यामुळे नागरिक ठरू शकते. त्यांना कॅम्पमध्ये ठेवले जाऊ शकते. त्यामुळे घरेदारे, गाड्या, नोकऱ्या सरकार ताब्यात घेऊन शकेल. याचा सर्वांत मोठा फटका भटक्‍या विमुक्तांना बसणार आहे. आपले नागरिकत्व सिद्ध न करता आलेल्या व्यक्तीला भारताचा नागरिक ठरविले जावू शकते. त्याला विरोध केल्यास प्रशासन पोलिस कारवाई होऊ शकते. या पार्श्‍वभूमीवर भटके-विमुक्तांनी एकत्र येऊन या कायद्याला विरोध करणे अपेक्षित आहे. याबाबतचे जिल्हावार दौरे करून जनजागृती केली जात आहे.'' 
ते म्हणाले, ""वरील तिन्ही कायदे अल्पसंख्याकांकडे बोट दाखवित असले तरी चार बोटे सर्व समाजाकडे आहेत. ही बाब भटके विमुक्तांनी लक्षात घेणे आवश्‍यक आहे. ही माहिती दौऱ्यात सांगण्यात येत आहे.'' 

राष्ट्रवादीत प्रवेश करणार 
केरळ, आंध्र प्रदेशने या कायद्यांना विरोध करणार ठराव केला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही अधिवेशनात संबंधित कायद्यांना विरोधाचा ठराव करावा, अशी मागणी आम्ही करणार आहेत. त्यासाठी बारामतीला भटक्‍या विमुक्‍तांचे महाअधिवेशन घेतले जाणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार महामेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. याच वेळी मीही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे, असेही श्री माने यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com