कोल्हापूर: मडिलगेत सेवानिवृत्त जवानाची मिरवणूक 

 procession of retired soldiers in Madil
procession of retired soldiers in Madil

आजरा - भारतीय सैन्य दलात तब्बल दोन तपे सेवा बजावून परतलेले मडिलगे (ता. आजरा) येथील सेवानिवृत्त सैन्यदलातील सुभेदार संभाजी घाटगे यांचे ग्रामस्थांनी जल्लोषी स्वागत केले. त्यांची सजवलेल्या मोटारीमधून मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी औक्षण केले. ग्रामस्थांच्या आगळ्या वेगळ्या स्वागताने माजी सुभेदार घाटगे व त्यांचे कुटुंबीय भारावून गेले. 

येथील तळे गल्लीत घाटगे कुटुंबीय राहतात. संभाजी घाटगे हे गेली 24 वर्षे सैन्यदलात कार्यरत आहेत. ते नुकतेच निवृत्त झाले. ते गावी परतणार असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्यांचे जल्लोषी स्वागत करण्याचे नियोजन त्यांच्या मित्र मंडळीने केले होते. ते गावी परतल्यावर त्यांचे गावच्या वेशीवर महिलांना औक्षण केले. त्यांना सन्मानपूर्वक फुलांनी सजलेल्या जीपमध्ये त्यांच्यासह पत्नी व मुलांना बसवून गावात ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मित्र मंडळी व ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. मित्रमंडळी व ग्रामस्थांच्या अनोख्या स्वागताने सेवानिवृत्त सुभेदार घाटगे यांचा ऊर भरून आला. 

या वेळी संभाजी जाधव, चंद्रकांत घाटगे, नामदेव हसबे, अनिल निऊंगरे, आनंदा मुरुकटे, धोंडीबा घाटगे, के. व्ही. येसणे, शिवाजी घाटगे, नीलेश घाटगे, जोतिबा येसणे, मारूती भोगले, शामराव हसबे, संतोष घाटगे यांनी संयोजन केले. 

मंगेश सोनार यांचाही सत्कार 
गडहिंग्लज तालुक्‍यातील दुग्गुनवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते मंगेश सोनार यांनी घरी परतणाऱ्या जवानांसाठी आपल्या वाहनातून कोल्हापूरहून मोफत घरी सोडण्याची सेवा पुरवीत आहेत. त्यांनी घाटगे यांना कोल्हापूर ते मडिलगेपर्यंत आपल्या वाहनातून घरी आणून सोडले. त्यांच्या सेवेची चर्चा परिसरात होती. त्यांचाही सत्कार संयोजकांनी केला. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com