प्राध्यापक घेत आहेत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन लेक्चर...

Professors are taking online lectures of students
Professors are taking online lectures of students

कोल्हापूर - अपूर्ण राहिलेल्या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन टिचिंगवर प्राध्यापकांनी जोर दिला आहे. मूडल, स्वयम पुरेपूर वापर करून विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे दिले जात आहेत. त्याचबरोबर आवश्यक बैठका ऑनलाइनच होत आहेत.

पारंपरिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांतील काही भाग विद्यार्थ्यांना शिकवून झालेला नाही. कोरोनाचे संकट गडद देशभरात लागू केलेल्या संचारबंदीने विद्यापीठे व महाविद्यालयांना १४ एप्रिलपर्यंत सुट्टी राहणार आहे. परीक्षा तोंडावर आल्या असून अपूर्ण राहिलेले धडे पूर्ण करण्याची जबाबदारी प्राध्यापकांवर येऊन ठेपली आहे. मूडल व स्वयम् द्वारे शिक्षक विद्यार्थ्यांना 
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असलेल्या ‘स्वयम’(SWAYAM) या उपक्रमाच्या https://swayam.gov.in व MOODLE द्वारे धडे देत आहेत. या अभ्यासक्रमांतील धड्यांचे रेकॉर्डिंग केलेले लेक्चर्स अपलोड केले आहेत. विद्यार्थी ते ऑनलाइन पाहून अवघड विषय समजून घेत आहेत.

विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल वही ऑनलाईन घेण्याच्या तयारीत प्राध्यापक वर्ग आहे. विशेष म्हणजे प्राध्यापकांच्या बैठकाही ऑनलाईन होऊ लागल्या आहेत. झूम क्लाऊड मिटींग्सद्वारे ते एकमेकांशी कनेक्ट होऊन परीक्षेच्या नियोजनाच्या अनुषंगाने चर्चा करताना दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com